breaking-newsमुंबई

एक्स्प्रेस गाडय़ांचे आजपासून नवीन वेळापत्रक

मुंबईतून सुटणाऱ्या सिंहगड, सेवाग्राम आणि मनमाड एक्स्प्रेस आता नियोजित वेळेपेक्षा पाच मिनिटे आधी सुटणार आहेत. हा बदल १ जुलैपासून लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, काही लांब पल्ल्यांच्या गाडय़ांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. कोल्हापूरवरून सुटणारी कोयना एक्स्प्रेस सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांऐवजी सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी सुटणार आहे. सोलापूर-कोल्हापूर एक्स्प्रेस गाडीला सुपरफास्ट गाडीमध्ये बदलण्यात आले आहे. त्यामुळे आता या गाडीचा वेळ जवळपास १ तासाने कमी होणार आहे. तर कोल्हापूरवरून सुटणारी सोलापूर एक्स्प्रेस या गाडीचा वेळ दोन तासांनी कमी होणार आहे.  मध्य रेल्वेने १० एक्स्प्रेस गाडय़ांचा प्रवास वेळ १० मिनिटे ते ३० मिनिटांपर्यंत, तर २९ एक्स्प्रेस गाडय़ांचा प्रवास वेळ तीन मिनिटे ते वीस मिनिटांपर्यंत कमी केला आहे. त्याचबरोबर ३० पॅसेंजर गाडय़ांचा वेळही सुमारे ३५ मिनिटांपर्यंत कमी केला आहे. १ ऑक्टोबर २०१९ पासून एलटीटी-हुबळी-एलटीटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच सीएसएमटी ते गडग एक्स्प्रेस गाडी आता दररोज धावणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button