breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

एकाच कुटुंबातील ३० जण कोरोना पॉझिटिव्ह

कल्याण | कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. कल्याण-डोंबिवलीमध्येही कोरोना रुग्णांची आकडेवारी चिंता वाढवणारी असताना कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या कुटुंबातील 30 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कल्याणच्या जोशीबाग परिसरातील या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. 4 मजली इमारतीमध्ये 33 जणांचं कुटुंब राहतं. गणपती दरम्यान संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. एका मुलाला कोरोनाची लागण झाली होती. त्यातून पुढे 33 पैकी 30 जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचा कहर वाढताच आहे. कल्याण-डोंबिवलीतील कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये आतापर्यंत एकूण 33 हजार 839 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 672 जणांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button