breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

एअर इंडिया विकण्याची तयारी सुरु…मोदी सरकारने मागवल्या निविदा

नवी दिल्ली | महाईन्यूज|

कोट्यवधींचा कर्जभार वाहणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडियाचे खासगीकरण लांबले आहे. कंपनीतील गुंतवणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी निविदा मागवण्याची तयारी सुरू आहे. अशातच एअर इंडियामधील हिस्सा विकण्यासाठी सरकारने निविदा मागविल्या आहेत. खरेदीसाठी प्रस्ताव दाखल करण्यासाठी 17 मार्च 2020 अखेरीची तारीख असणार आहे.

सरकारने एअर इंडियातील 100 टक्के समभाग विकण्याचा निर्णय घेतला आहे. बिड डॉक्युमेंटनुसार, एअर इंडिया एक्स्प्रेस (Air India Express) आणि एअरपोर्ट सर्व्हिस कंपनी (AISATS) या दोन कंपन्यांमधील 50 टक्के भागही सरकारनं विक्रीस काढले आहेत. एअर इंडियाचं जॉइंट वेंचर असलेल्या AISATS मध्ये त्यांची 50 टक्के भागीदारी आहे.

बोली प्रक्रियेमध्ये, जे पात्र ठरतील त्यांना 31 मार्चपर्यंत याची माहिती देण्यात येईल. दरम्यान, एअर इंडिया आणि इंडिया एक्सप्रेसचे 100 टक्के शेअर्स सरकराकडेच आहेत. याआधी 2018मध्ये एअर इंडियामध्ये 76 टक्के भागीदाी विकण्याचा प्रस्ताव मोदी सरकारने मांडला होता. परंतु, त्यावेळी एकही खरेदीदार मिळाला नाही. अशातच सरकारने 100 टक्के हिस्सेदारी विकण्याचा निर्णय घेतला.

गृह मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेत एका मंत्रिमंडळाने 7 जानेवारी रोजी एअर इंडियाच्या खाजगीकरणाशी निगडीत प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली होती. एअर इंडियावर 80 हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. दरम्यान, एअर इंडियाला 1932मध्ये जेआरडी टाटा यांनी टाटा एअरलाइन्स या नावाने लॉन्च केलं होतं. 1946 मध्ये याचं नाव बदलण्यात आलं होतं आणि 1953 मध्ये सरकारने याचे सर्व अधिकार आपल्याकडे घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button