breaking-newsमनोरंजन

ऋषी कपूर यांच्या ‘मुल्क’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर आणी तापसी पन्नू यांनी अभिनित केलेला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये ऋषी कपूर यांनी आरोपी मुराद अली मोहम्मद, तर तापसी पन्नू हिने वकीलाची भूमिका साकारली आहे.

‘मुल्क’ चित्रपटाचे पहिले पोस्टर ऋषी कपूर आणि फिल्म ट्रेंडचे विश्लेषक तरण आदर्श यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे. हा चित्रपट जॉली एलएलबी 2, नो वन किल्ड जेसिका आणि दामिनी या चित्रपटावर आधारित असल्याचे दिसते. चित्रपटाची शूटिंग बनारस आणि लखनौमध्ये झाली असून तापसी पन्नू हिने प्रथमच ऋषी कपूर यांच्यासोबत काम केले आहे.

हा चित्रपट वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित आहे. यामध्ये ऋषी कपूर, रजत कपूर, तापसी पन्नू, प्राची शाह आणि आशुतोष राणा महत्त्वाच्या भूमिका निभावत आहेत. ऋषि कपूर मुराद अली मोहम्मदची भूमिकेत दिसणार असून त्यांच्यासाठी वकील म्हणून तापसी पन्नू न्यायालयात लढतील.

View image on TwitterView image on Twitter

taran adarsh

@taran_adarsh

Rishi Kapoor and Taapsee Pannu… First look posters of … Teaser out tomorrow… Directed by Anubhav Sinha… Produced by Deepak Mukut and Anubhav Sinha… 3 Aug 2018 release.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button