breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

ऊर्जामंत्र्यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

मुंबई | राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर परस्पर नेमलेल्या अशासकीय सदस्यांच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानंतर या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना अंधारात ठेऊन वीज कंपन्यांवर परस्पर नियुक्त्या केल्या होत्या. यामध्ये महापारेषण, महावितरण आणि होल्डिंग कंपन्यांवरील 16 सदस्यांचा समावेश होता.

यातील बहुतांश सदस्य हे नागपुरातील होते. काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी याबाबत दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे नितीन राऊत यांची तक्रार केली होती. राज्यात तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे. या कंपन्यांवर तीन पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळायला हवी होती. मात्र नितीन राऊत यांनी ना घटक पक्षांशी चर्चा केली ना स्वतःच्या काँग्रेस पक्षातील नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेतूनही याबाबत नाराजीचे सुर उमटत होते. त्यामुळे काँग्रेसने ही बाब गांभीर्याने घेतली होती. काल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट शब्दांत नितीन राऊत यांना या सगळ्या नियुक्त्या तातडीने रद्द करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button