breaking-newsताज्या घडामोडीपुणे

ऊर्जामंत्री राऊत भीमा कोरेगाव येथील शौर्य स्थळाला करणार अभिवादन

मुंबई | प्रतिनिधी

ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत हे सोमवारी (दि. १) एकदिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्हयातील भीमा कोरेगांव येथील विजय स्तंभास सकाळी 6 वाजता मानवंदना देणार आहेत. मानवंदना दिल्यानंतर भीमा कोरेगाव समिती तर्फे आयोजित कार्यक्रमालाही ते उपस्थित राहतील. त्यानंतर डॉ नितीन राऊत वढु( बद्रुक ), तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ व वढु येथे सिद्धनाथ गायकवाड (महाराज), स्थळाला भेट देऊन मानवंदना देतील. याच दरम्यान सिद्धनाथ महाराजांचे वंशज पांडुरंग गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करतील, अशी माहिती जनसंपर्क विभागाने दिली आहे.

डॉ. राऊत हे यानंतर पुणे शहरात परतणार असून सकाळी 11 वाजता वाडिया महाविद्यालयासमोर पंचशिल चौक येथील माता रमाबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर ताडीवाला रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयालाही सकाळी सव्वा अकरा वाजता भेट देणार आहेत. दुपारी अडीच वाजता शिवाजी नगर येथील काँग्रेस भवन येथे ते कार्यकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधणार आहेत. दुपारी 3 वाजता काँग्रेस भवन मध्ये पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर पत्रकारांशी वार्तालाप करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button