breaking-newsमहाराष्ट्र

उस्मानाबादमधून राणा जगजीतसिंह पाटील, तर माढ्यातून संजय शिंदेंना राष्ट्रवादीची उमेदवारी

बारामती, (महा-ई-न्यूज) –  लोकसभा निवडणुकीसाठी उस्मानाबादच्या उमेदवारीवरून सुरू असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे. राष्ट्रवादीकडून उस्मानाबादमधून राष्ट्रवादीचे माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचा मुलगा राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवार देण्यात आली आहे. खुद्द शरद पवार यांनी या उमेदवारीबाबत घोषणा केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून उस्मानाबादेत राष्ट्रवादीकडून उमेदवारी कुणाल यावरून चर्चांना उधाण आलं होतं. पद्मसिंह पाटील पुन्हा निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. त्यानंतर पाटील घराण्याची सून अर्चना पाटील यांचं नाव पुढे आलं. अखेर आज बारामतीत बोलताना शरद पवार यांनी राणाजगजितसिंह पाटील यांच्या नावाची घोषणा केली.

शिवसेनेकडून आज उस्मानाबादेतून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे, ओमराजे आणि राणाजगजितसिंह यांच्यात आधीपासून राजकीय संघर्ष आहे. पवनराजे निंबाळकर खून खटल्यानंतर उस्मानाबादेत पद्मसिंह पाटील विरुद्ध पवनराजे निंबाळकरांचा मुलगा ओमराजे यांचा वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे विरुद्ध राणाजगजितसिंह यांच्यातील लढत चुरशीची झाली आहे.

माढ्यातून संजय मामा मैदानात 

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. शरद पवार यांच्या उपस्थितीत शिंदे स्वगृही परतले. शिंदे यांना भाजपने पाठिंबा दिला होता. संजय हे माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे यांचा भाऊ आहेत. शिंदे हे मोहिते पाटील यांचे विरोधक तर अजित पवार यांचे समर्थक समजले जातात. अंतर्गत राजकारणामुळे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी संजय शिंदेंना पाठिंबा देत जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळवून दिलं होतं. शिंदे यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशामुळे माढ्याच्या राजकारणात आणखी चुरस वाढणार आहे.

संजय शिंदे हे माढ्याचे उमेदवार असतील अशी घोषणा शरद पवारांनी केली. आता भाजप कुणाला उमेदवार देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button