breaking-newsमहाराष्ट्र

उर्मिला मातोंडकर यांची ईव्हीएम विरोधात तक्रार

मुंबई – आज संपुर्ण देशाचं लक्ष लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. एकीकडे केंद्रात भाजपा सरकार येणार की काँग्रेसला सत्ता मिळणार याची उत्सुकता असून महाराष्ट्रात मतदारांनी काय कौल दिला आहे याकडेही अनेकांच्या नजरा आहेत. लोकसभा निवडणूक म्हणजे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीआधीची रंगीत तालीम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने देशात मोदी सरकारची हवा आहे की नाही आणि महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युती टिकणार का ? याचं उत्तर मिळेल.

महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा असून राज्यात चार टप्प्यात मतदान पार पडलं होतं. ११ एप्रिलला ७, १८ एप्रिलला १०, २३ एप्रिलला १४ आणि २९ एप्रिलला १७ मतदारसंघात मतदान पार पडलं होतं. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळी वंचित बहुजन आघाडी सर्व जागांवर निवडणूक लढवत असून त्यांना किती जागा मिळतात हे पाहणंही विशेष आहे.

दुसरा एक मह्त्त्वाचा मुद्दा म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे. भाजपा-शिवेसेनेविरोधात राज ठाकरे यांनी प्रचार केल्याने त्याचा खूप मोठा फटका युतीला बसेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी ज्या मतदारसंघांमध्ये प्रचार केला आहे तिथेदेखील सर्वांच्या नजरा असून काय निकाल लागेल हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

उर्मिला मातोंडकर यांची ईव्हीएमविरोधात तक्रार

उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार असणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी ईव्हीएमविरोधात तक्रार केली आहे. भाजपाच्या गोपाळ शेट्टींविरोधात उर्मिला मातोंडकर मैदानात असून पिछाडीवर आहेत. गोपाळ शेट्टी यांचा विजय नक्की मानला जात असून त्यांनी विजय साजरा करण्यासही सुरुवात केली आहे.

उस्मानाबादमध्ये शिवसेनेची आघाडी

आठव्या फेरीनंतर उस्मानाबादमध्ये शिवेसनेच्या ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी घेतली आहे. ओमराजे निंबाळकर 1 लाख 92 हजार 898 मतांनी आघाडीवर आहेत. राणा जगजित सिंह पाटील 1 लाख 50 हजार 434 मतांनी पिछाडीवर आहेत. 30 हजार 736 मतांनी तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे अर्जुन सलगर आहेत.

मुंबईतील सहा जागांवरील सध्याचे अपडेट

दक्षिण मुंबई – शिवसेना अरविंद सावंत 68845, काँग्रेस मिलिंद देवरा 39671

दक्षिण मध्य मुंबई – शिवसेना राहूल शेवाळे 86807, काँग्रेस एकनाथ गायकवाड 57169

मुंबई उत्तर पश्‍चिम – शिवसेना गजानन किर्तीकर 43819, काँग्रेस संजय निरूपम 21826

मुंबई उत्तर पुर्व – भाजप मनोज कोटक 163683, राष्ट्रवादी काँग्रेस संजय दिना पाटील 113288

मुंबई उत्तर मध्य – भाजप पुनम महाजन 54935, काँग्रेस प्रिया दत्त 31754

उत्तर मुंबई – भाजप गोपाळ शेट्टी 90947, काँग्रेस उर्मिला मातोंडकर 29383

संजय निरुपम यांनी उर्मिला मातोंडकर यांना फसवलं

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी उर्मिला मातोंडकर यांना फसवलं आहे असा आरोप मुंबई उत्तरमधील भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केला आहे. संजय निरुपम यांनी स्वत:च्या फायद्यासाठी उर्मिला यांचा बळी दिला, पण फटका दोघांना बसेल असं त्यांनी म्हटलं आहे.

कोण कुठे आघाडीवर, पिछाडीवर…काय आहे कौल

माढा – भाजपा आघाडीवररणजितसिंह निंबाळकर (भाजपा) ८१६८६संजय शिंदे (राष्ट्रवादी) ८३१५१

धुळे डाँ. सुभाष भामरे (भाजपा) ४१६११कुणाल पाटील (काँग्रेस) २०१२१

दिंडोरी भारती पवार (भाजपा) ५१६३०धनराज महाले (राष्ट्रवादी) ३१३२९

मावळश्रीरंग बारणे – 2,10, 410पार्थ पवार – 1,50, 414राजाराम पाटील – 16,142

नांदेड अशोक चव्हाण (काँग्रेस) 80621प्रताप पाटील (भाजपा) 92259यशपाल भिंगे (वंचित आघाडी) 29905

लातूरसुधाकर श्रुंगारे (भाजपा) – ५८०६५मच्छिंद्र कामत (काँग्रेस) – २५६५८राम गारकर (वंचित बहुजन आघाडी) – ९१५८

बीड डॉ.प्रीतमताई गोपीनाथराव मुंडे (भाजपा) – 84 हजार 685 बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी) 59 हजार 654 विष्णू जाधव (वंचित बहुजन आघाडी) 8 हजार 780संपत रामसिंग चव्हाण (बंजारा संघ) 2 हजार 338 .

दक्षिण मुंबई अरविंद सावंत (शिवसेना) – 41169मिलिंद देवरा (काँग्रेस) 19933

मुंबई दक्षिण मध्यएकनाथ गायकवाड (काँग्रेस) 35384 राहुल शेवाळे (शिवसेना) 55739

हिंगोली हेमंत पाटील(शिवसेना) – 29354सुभाष वानखेड़े (काँग्रेस)- 13635मोहन राठौड़ (वंचित आघाडी )- 10449

लातूरसुधाकर श्रुंगारे (भाजपा) ५४३९३मच्छिंद्र कामत (काँग्रेस) २२७१२राम गारकर (वंचित बहुजन आघाडी) ८१२१

राजू शेट्टी २१ हजार मतांनी पिछाडीवर

सहाव्या फेरीअखेर कोल्हापूर मतदारसंघातून संजय मंडलिक ९६ हजार १८२ मतांनी आघाडीवर आहेत. तर हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी एकवीस हजार मतांनी पिछाडीवर आहेत. राजू शेट्टींचा विजय नक्की मानला जात आहे, मात्र सध्या ते पिछाडीवर असल्याने निकालाची उत्सुकता लागली आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी यंत्र बंद

पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड आणि शिवाजी नगर मधील मतमोजणी यंत्र बंद पडल्याची माहिती मिळत आहे. यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मुंबईमध्ये आवाज शिवसेना-भाजपा युतीचाच, सहाही जागांवर आघाडीवर

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. देशभरामधील प्राथमिक मतमोजणीचे कल हे एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरवणारेच असल्याचे दिसत आहे. मुंबईमध्येही शिवसेना भाजपा युतीचीच हवा दिसत आहे. मुंबईतील सर्वच्या सर्व सातही मतदारसंघांमध्ये युतीचेच उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

सोलापुरात तिरंगी लढत, जय सिध्देश्वर महास्वामी आघाडीवर; सुशीलकुमार शिंदे आणि प्रकाश आंबेडकर पिछाडीवर

सोलापुरात जे प्राथमिक कल हाती आले आहेत त्यानुसार भाजपाचे उमेदवार जय सिध्देश्वर महास्वामी यांनी आघाडी घेतली आहे. जय सिध्देश्वर महास्वामी 61 हजार 846 मतांनी आघाडीवर आहेत. महत्त्वाचं म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे ही लढत रंगतदार आहे. पण जय सिध्देश्वर महास्वामी यांनी आघाडी घेतल्यामुळे तिरंगी लढत झाली आहे. सुशीलकुमार शिंदे 44 हजार 134 मतांनी दुसऱ्या क्रमांकावर असून प्रकाश आंबेडकर 18 हजार 252 मतांनी पिछाडीवर आहेत.

सेन्सेक्स 40 हजारांवर

इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 40 हजारांवर पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीचे कौल समोर येत असून स्थिर सरकार येत असल्याच्या चिन्हानंतर शेअर बाजारात उसळी. सुरुवातीचे जे कल हाती येत आहेत त्यानुसार भाजपाने आघाडी घेतली आहे. मुंबईतही सर्व जागांवर भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे.

‘भावी खासदार अमोल कोल्हे’, निकालापूर्वीच पुण्यात झळकले विजयाचे बॅनर

लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूर मतदारसंघामध्ये चुरशीची लढत होणार आहे. प्रथामिक कलांमध्ये राष्ट्रावादीचे अमोल कोल्हेंनी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे. अमोल कोल्हेंविरोधात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली असली तरी पुण्यामध्ये राष्ट्रवादीने शक्तीप्रदर्शन सुरु केले आहे. पुण्यातील बालेवाडी स्टेडियमबाहेर अमोल कोल्हेंचा भावी खासदार असा उल्लेख असणारे बॅनर झळकले आहेत.

मुंबईमधील कल, शिवसेना-युती आघाडीवर

मुंबईत सहा जागांचे निकाल हाती येणार असून सध्या जे चित्र दिसत आहे त्यानुसार शिवसेना-युती सध्या आघाडीवर दिसत आहे.

दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत आघाडीवर असून मिलिंद देवरा पिछाडीवरआहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून गोपाळ शेट्टी आघाडीवर असून उर्मिला मातोंडकर पिछाडीवर आहे. ऊर्मिला मातोंडकर निवडणुकीच्या रिंगणात असल्या कारणाने सर्वांच या निवडणुकीकडे लक्ष आहे. उत्तर मध्य मुंबईतून पुनम महाजन आघाडीवर असून प्रिया दत्त पिछाडीवर आहे. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे पूनम महाजन निवडून आल्या होत्या. त्यामुळे यावेळी काय निकाल लागतोय याकडे सर्वांचं लक्ष आहे. उत्तर मुंबईतून मनोज कोटक आघाडीवर असून वायव्य मुंबईतून गजानन किर्तीकर  आघाडीवर आहेत. तर दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे आघाडीवर आहे.

माढ्यात संगीत खुर्ची, भाजपला सहा मतांची आघाडी

माढ्यात संगीत खुर्ची, भाजपला सहा मतांची आघाडी

अमरावती मतदारसंघात आनंदराव अडसुळ यांची आघाडी

अमरावती मतदारसंघात आनंदराव अडसुळ यांची आघाडी

आनंदराव अडसुळ -67340नवनीत राणा – 63109गुणवंत देवपारे -9341अरूण वानखडे -1793

आनंदराव अडसुळ 4231 मतांनी आघाडीवर

भंडारा -गोंदिया मतदारसंघात भाजपाची आघाडी

भाजपा उमेदवार सुनील मेंढे 7412 मताने पहिल्या फेरीत आघाडी

सुनील मेंढे (भाजपा) 25082 भाजपनाना पंचबुधे (राष्ट्रवादी) 17670 विजया नंदुरकर (बसपा) 1595

दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत १५९०४ मतांनी आघाडीवर

दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत १५९०४ मतांनी आघाडीवरअरविंद सावंत – २८७२०मिलिंद देवरा – १२८१६

 इम्तियाज जलील आठ हजार मतांनी आघाडीवर

औरंगाबाद – दुसऱ्या फेरीअखेर इम्तियाज जलील 36192, हर्षवर्धन जाधव 27915, सुभाष झांबड – 6404, चंद्रकांत खैरे 23565

माढा मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकर आघाडीवर

माढा मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकर आघाडीवर संजय शिंदे (राष्ट्रवादी) ४२७१० रणजितसिंह निंबाळकर (भाजपा) – ४३५८२

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button