breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

मटणावरुन भाजपा कार्यकर्ते भिडले, हाणामारीत नऊ कार्यकर्ते जखमी

झारखंड | महाईन्यूज

झारखंडमधील जमशेदपूरजवळील डिमना तलाव परिसरात स्थानिक भाजपा नेत्यांनी आयोजित केलेल्या सहलीमध्ये दोन गटांमध्ये वाद झाला होता. मटणावरुन झालेल्या या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले. या हाणामारीमध्ये नऊ जण गंभीर जखमी झालेले आहेत.माहितीनुसार, डिमना तलाव परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सहलीमध्ये भाजपाने अनेक कार्यकर्ते गेले होते. त्यावेळी तेथे मटण वाटपावरुन वाद झाला. भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिनेश कुमार यांनी मध्यस्थी करुन दोन्ही गटांना शांत केलं आहे. नंतर सहलीच्या ठिकाणाहून साकची येथे आल्यावर या दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. त्यावेळी रस्त्यावर या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये काठ्या, सळयांनी हाणामारी झाली.

अचानक सुरु झालेल्या या तुंबळ हाणामारीमुळे परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर साकची पोलीस घटनास्थळी पोहचले आणि दोन्ही गटांची हाणामारी थांबवली. मात्र पोलीस पोहचेपर्यंत दोन्हीकडील नऊ कार्यकर्ते जखमी झालेले होते. सर्व जखमींना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथेही दोन्ही गटांमध्ये वाद झाला. येथे काही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करुन वाद शांत केला. या वादात एका गटातील साकची विभागाचे अध्यक्ष ध्रुव मिश्रा, शंकर प्रसार, हेमंत साहू आणि अजय साहू जखमी झाले आहेत. या पैकी शंकरला गंभीर जखम झाली आहे. दुसऱ्या गटातील भाजपा युवा मोर्चाचे सोशल मिडिया प्रमुख माँटी अग्रवाल, सोनू गोस्वामी, सौरव सिंह आणि बाँके सिंह हे जखमी झालेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button