breaking-newsमहाराष्ट्र

उर्मिला मातोंडकर यांचा ‘जय महाराष्ट्र’, शिवसेनेत अधिकृत प्रवेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

मुंबईः अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. आज मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून मातोंडकर यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी सुभाष देसाई, आदेश बांदेकर आदींसह इतर महत्त्वाचे शिवसेना नेते उपस्थितीत होते. शिवसेनेतर्फे उर्मिला यांना राज्यपाल नियुक्त कोट्यातून उमेदवारी देण्यात येणार आहे.

उर्मिला यांनी विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. त्यात पराभूत होत त्याचे खापर स्थानिक काँग्रेस नेत्यांवर फोडले होते. पुढे विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त कोट्यासाठी उर्मिला यांची उमेदवारी नाकारली होती.

अवश्य वाचाः हिवाळी अधिवेशन पुढे ढकलणार? 3 डिसेंबरला होणार निर्णय

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button