breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

निवडणुक आचारसंहितेत पिंपरीच्या शगून चाैकात उभारली अनधिकृत इमारत

  • अनधिकृत बांधकाम महापालिकेतील अधिका-यांचा आशिर्वाद

पिंपरी ( महा ई न्यूज ) – लोकसभा निवडणुकीत आचारसंहितेचा गैरफायदा घेवून पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात फोफावली आहेत. या बांधकामाकडे बीट निरीक्षकांसह कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंत्याच्या आर्थिक संगणमताने दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे पिंपरीतील शगून चाैकात अनधिकृत इमारतीचे टोलजंग बांधकाम करण्यात आले आहे. त्या बांधकामावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणूक आचारसंहितेचा गैरफायदा घेत पिंपरीत संजय कटारिया यांचा अनाधिकृत बांधकामाचा डोलारा उभा राहिला आहे. पिंपरी प्रभाग क्रमांक २१ मधील जे. एन. रोड ते हाँग काँग दुकान रोड सविता हार्डवेअर दुकानासमोर संजय कटारिया यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा सदर उपयोग गैर पद्धतीने स्वतःच्या अनाधिकृत बांधकाम पुर्ण करण्यासाठी घेतला आहे. निवडणुकीची आचार संहिता लागल्यानंतर बांधकाम सुरु करण्यात आलेले, सदरील अनाधिकृत दुमजली असून खाली तीन वर चार शेटरचे बांधकाम लोकसभा निवडणूक निकालापुर्वीचं पुर्णत्वास केले आहे. अतिशय जलद वेगवान पद्धतीने सदर निकृष्ट दर्जाचे काम घाईघाईने उरकण्यात आले आहे.

सदर अनाधिकृत बांधकामास पिंपरी-चिंचवड महानगरपालिका बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागातील जबाबदार अधिकारी कर्मचारी ही तेवढेच दोषी आहेत. तर संजय कटारिया यांनी आचारसंहिता आणि पालिका प्रशासनाच्या व्यस्त भूमिकेचा स्वार्थासाठी चांगलाच उपयोग करुन घेतलेला दिसतोय, सदर अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची संबंधी ४ मे २०१९ रोजी पालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागास अशीअजय लोंढे यांनी लेखी तक्रार केली. त्या बांधकामावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे सदरील बांधकाम न पाडल्यास १३ मे २०१९ रोजी महापालिका भवनासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button