breaking-newsमनोरंजनराष्ट्रिय

उर्मिलाच्या विरोधात भाजपाची पोलिसांत तक्रार, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

लोकसभा निवडणुकीसाठी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकताच उर्मिला मातोंडकरने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. उत्तर मुंबईतून काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उर्मिलाच्या विरोधात भाजपाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. एका दुरचित्रवाणीच्या कार्यक्रमात हिंदू धर्माबद्दल अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत तिच्याविरोधात पवई पोलीस स्टोशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

उर्मिलाने इंडिया टुडे या वृत्तवाहिनीच्या एका कार्यक्रमादरम्यान बोलताना हिंदू हा सगळ्यात जास्त हिंसाचार करणारा धर्म असल्याचे म्हटले होते. तिच्या या वक्तव्याने हिंदूंच्या भावना दुखावल्याचे सांगत भाजपाचे प्रवक्ते सुरेश नाखवा यांनी पवई पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सुरेश नाखवा यांनी तक्रारीचा फोटो फोटो ट्विटरवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. सुरेश नाखवा यांनी या वक्तव्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनाही जबाबदार धरले आहे. तक्रारीमध्ये उर्मिलासोबत राहुल गांधी आणि राजदीप सरदेसाई यांचेही नाव आहे. दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून वक्तव्य केल्याचा ठपका सुरेश नाखवा यांनी तक्रारीत म्हटले आहे. भा.द.वि. कलम २९५ अ नुसार उर्मिला मारतोंडकर आणि राहुल गांधीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

 

Chowkidar Suresh Nakhua 🇮🇳

@SureshNakhua

Filed complaint under Section 295A & other relevant sections against Ms Urmila Matondkar, Mr Rahul Gandhi and Mr Rajdeep Sardesai for calling Hinduism most violent religion of the world.

265 people are talking about this

दरम्यान, गुढीपाडव्यानिमित्त शहरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रांना शनिवारी राजकीय रंग चढला. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर विविध पक्षाच्या बहुतांश उमेदवारांनी या शोभायात्रांच्या निमित्ताने मतदारांचे लक्ष वेधून घेतले. उत्तर मुंबईतील महाआघाडीच्या उमेदवार आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मतदारसंघातील एका शोभायात्रेत सहभागी लेझीम पथकासोबत ताल धरला. त्यांच्याप्रमाणे ईशान्य मुंबईतील युतीचे उमेदवार मनोज कोटक, विद्यमान खासदार किरीट सोमैया पूर्व उपनगरांतील शोभायात्रांमध्ये सहभागी झाले. कोटक यांनी पालखी खांद्यवर घेतली, अब्दागिरी नाचवून उपस्थितांचे लक्ष वेधले. याच मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार संजय दिना पाटीलही शोभा यात्रांमध्ये सहभागी झालेले दिसले. दक्षिण मध्य मुंबईतील युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी शोभायात्रेत सहभागी होऊन मतदान करा, हक्क बजावा, असा संदेश दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button