breaking-newsआंतरराष्टीयआरोग्य

सिंध प्रांतात ६०० जणांना ‘एचआयव्ही’ लागण

पाकिस्तानातील सिंध प्रांतात सहाशेजणांना एचआयव्ही विषाणूची बाधा झाली असून हा प्रसार वाढतच चालला आहे त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेची मदत मागवण्यात आली आहे.

आतापर्यंत सिंध प्रांतातील लारखाना जिल्ह्य़ातील रातोडेरो जिल्ह्य़ात २१,३७५ जणांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली त्यात ६८१ जणांना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विषाणूची लागण झालेल्यात ५३७ व्यक्ती या २ ते १५ वयोगटातील आहेत. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, असुरक्षित रक्तसंक्रमण, वैदूंकडून केले जाणारे उपचार व जंतुसंसर्ग असलेली उपकरणे यातून एचआयव्हीचा प्रसार झाला असावा. पंतप्रधान इमरान खान यांचे राष्ट्रीय आरोग्य सेवा विशेष सहायक झफर मिर्झा यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेचे दहा सदस्यांचे पथक काही दिवसात पाकिस्तानात येईल अशी अपेक्षा आहे. रातोडेरो येथील एचआयव्ही प्रसाराचे नेमके कारण आम्हाला समजून घ्यायचे आहे.

अमेरिकेतील सीडीसी या संस्थेचे प्रतिनिधीही या पथकात असतील. जंतुसंसर्ग झालेल्या सुया, रक्तसंक्रमण यामुळे एचआयव्हीचा प्रसार झाला असावा असा आमचा अंदाज आहे. पोलिसांनी गेल्या महिन्यात एका डॉक्टरला विषाणूयुक्त रक्त रुग्णांना दिल्याप्रकरणी अटक केली होती. यात १७ वैदूंनाही अटक केली असून त्यांचे कथित दवाखाने बंद करण्यात आले आहेत. मिर्झा यांनी सांगितले की, पन्नास हजार एचआयव्ही तपासणी संच मागवण्यात आले आहेत. मिरपूरखास, नबाब शहा, हैदराबाद येथे एचआयव्ही उपचार केंद्रे सुरू करण्यात येत आहेत.  पाकिस्तानात १ लाख ६३ हजार जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचा अंदाज असला तरी सरकारी एचआयव्ही प्रतिबंध कार्यक्रमात २५ हजार रुग्णांचीच नोंद आहे. त्यातील १६ हजार रुग्ण नियमित उपचारासाठी येतात. सिंधमध्ये २०१६  तर पंजाबमध्ये २००८ मध्ये एचआयव्हीचा प्रसार वाढला होता. एचआयव्ही लागण होण्यात पाकिस्तान सध्या दुसऱ्या क्रमांकावर असून २०१७ मध्ये २० हजार जणांना लागण झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button