आंतरराष्टीय

चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे सैन्यदलांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे निर्देश

चीनकडून पुन्हा एकदा युद्धखोरीची भाषा करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी चिनी सैन्यदलांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. युद्धाच्या तयारीसाठी शक्य असेल ते सर्व काही करा असे स्पष्ट निर्देश जिनपिंग यांनी शुक्रवारी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना दिले.

दक्षिण चीन सागरात चीनचे शेजारी देशाबरोबर असलेले वाद तसेच व्यापारापासून तैवानच्या दर्जाबद्दल अमेरिकेबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने आपल्या सैन्यदलाला अधिक सक्षम आणि भक्कम करण्यावर भर दिला आहे. चीनसमोरील धोके आणि आव्हाने वाढत आहेत. त्यामुळे सैन्यदलांनी सुरक्षा आणि विकासाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम केले पाहिजे असे जिनपिंग यांनी जमलेल्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना सांगितले. शिन्हुआ या अधिकृत वृत्तसंस्थेने ही माहिती दिली.

केंद्रीय लष्करी आयोगाचे अध्यक्ष असलेले शी जिनपिंग म्हणाले की, सैन्यदलांनी नव्या युगाच्या दृष्टीने रणनिती तयार केली पाहिजे तसेच युद्धाच्या तयारीची जबाबदारी घेतली पाहिजे. सैन्य दलांनी आणाबाणीने प्रसंगात तात्काळ कारवाई करण्यासाठी सक्षम असले पाहिजे तसेच संयुक्त कारवाई करण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे असे जिनपिंग म्हणाले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button