breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

नाराज शिवसैनिक राष्ट्रवादीच्या वाटेवर; खासदार श्रीरंग बारणे यांना उरणमध्ये धक्का!

  • खासदार बारणेंनी पाच वर्षे शिवसैनिकांना झुलवत ठेवल्याचा आरोप
  • उरण केंद्राशी निगडीत अनेक प्रश्न प्रलंबित, प्रकल्पग्रस्तांना कधी मिळणार न्याय?
  • शहरातील शेकडो तरुण-तरुणींचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश 

उरण ( महा ई न्यूज ) – मावळ लोकसभेतील शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी मागील पाच वर्षात उरण केंद्राशी निगडीत अनेक प्रश्न आजही प्रलंबित ठेवले आहेत. ते प्रश्न सोडविण्याची तसदी शिवसेना खासदारांनी घेतली नसल्याने प्रकल्पग्रस्त न्याय-हक्कापासून वंचित राहिले आहेत, असा आरोप करीत शिवसेनेतील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे, उरणमधील काही निष्ठावंत शिवसैनिकांशी संपर्क न ठेवता, त्याच्या अडीअडचणी, समस्या कधीही जाणून न घेता, गेली पाच वर्षे शिवसैनिकांना झुलवत ठेवणा-या खासदारांमुळे गटा-तटांचे राजकारण उफाळून आले आहे. त्यामुळे नाराज शिवसैनिक महाआघाडीच्या संपर्कात गेले असून उमेदवार पार्थ पवारांना निवडून आणण्याचा निर्धार त्यांनी केला आहे, अशी चर्चा उरणमध्ये राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेना-भाजप युतीतून शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. बारणेंना यांना उमेदवारी देताच उरणमध्ये शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांवर नाराज असलेल्या शिवसैनिकांच्या भावनाचा उद्रेक झाला. त्यांनी बारणे विरोधात उघड नाराजी व्यक्त करीत बारणेंना मदत न करण्याचा निश्चिय केला आहे.
यावेळी एक नाराज शिवसैनिक म्हणाले की, गेली अनेक वर्षे आम्हाला खासदारांनी झुलवत ठेवले,  आता निवडणुकीत आमची ताकद काय आहे ते त्यांना दाखवून देवू, वेळप्रसंगी आम्ही नाराज शिवसैनिक आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी निश्चित प्रयत्न करु, असा इशारा नाराज शिवसैनिकांनी यावेळी दिला आहे.
****
शेकडो तरुण-तरुणींसह महिलांचा राष्ट्रवादीत प्रवेश
तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वाे शरद पवार यांच्या विचार प्रणालीवर विश्वास ठेवून उरणच्या विविध गावातील शेकडो तरुण-तरुणी, महिलांनी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, तालुकाध्यक्ष मनोज भगत, भावना घाणेकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेश केलेल्यांमध्ये नंदकुमार पाटील, राकेश कडू, प्रेमल पाटील, सुर्यकांत मोकल, मिथून मोकल, साईनाथ पाटील, धीरज पाटील, प्रवीण घरत, अजय घरत यांच्यासह अनेक तरुण-तरुण आणि महिलांचा समावेश आहे.
****
उरण, कर्जत, पनवेलमधून पार्थ पवारांना देणार लाखोंचे “लीड”
मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांना उरण, कर्जत आणि पनवेलमधून लाखोंचे लीड देण्यासाठी महाआघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. शेकाप, काॅंग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्व मतभेद विसरुन पार्थ पवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करु लागले आहेत. पार्थ पवारांच्या विजयासाठी गावागावात जावून नागरिकांच्या बैठका, प्रभातफे-या, प्रमुखांच्या गाठीभेटी घेवून मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, शेकापचे मेघनाथ तांडेल, काँग्रेसचे जे.पी. जोशी यांनी कार्यकर्त्यांना घेवून उरण परिसरात पिंजून काढला आहे. मावळमध्ये महाआघाडीचा झेंडा रोवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button