पिंपरी / चिंचवड

उप जिल्हाधिकारी पदी निवड झालेल्या पूजा गायकवाडचा युवक काँग्रेसकडून सत्कार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – नुकतेच उप जिल्हाधिकारी पदाच्या स्पर्धा परिक्षेत राज्यात दुस-या क्रमांकाने निवड झालेल्या पुजा गायकवाड यांचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.

पुजा गायकवाड (उपजिल्हाधिकारी, पुणे) हिने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत उत्तम यश संपादित केले.  तिने समाजापुढे व युवा पीढीसमोर एक आदर्श निर्णाण केला. तिच्या या उत्तूंग यशाची दखल घेऊन पिपंरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला, असे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले.

याप्रसंगी त्यांचे वडील तानाजी गायकवाड, आई अरूणा गायकवाड, जिल्हा सरचिटणीस गौरव चौधरी, पिपंरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, चिंचवड युवक काँग्रेस उपाध्यक्ष सौरभ शिंदे व युवक काँग्रेसचे पदाधिकारी अनिल सोनकांबळे आदी उपस्थित होते.

गायकवाड कुटुंबियांनी युवक काँग्रेसचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button