breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

उपमुख्यमंत्री पदासाठी अजित पवारांच्या नावावर राष्ट्रवादीत एकमत

नवी दिल्ली | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा भाचा आणि राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हेच उपमुख्यमंत्री बनणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अजित पवारांच्या नावावर राष्ट्रवादीत एकमत झाल्याचं समजतंय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील अजित पवारांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत सकारात्मक असल्याचंही समजतं. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीदेखील या बातमीला अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला.

यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांशीही चर्चा केल्याचं समजतंय. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा अशा सर्व भागांतील नेत्यांची मतं विचारात घेण्यात आल्याचं समजतं. अजित पवार यांची प्रशासनावरची घट्ट पकड दिसून येते, त्यामुळेच त्यांच्या नावाला सर्वांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्याचं सांगण्यात येतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button