breaking-newsताज्या घडामोडीपुणे

उद्या भारत बंद; पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व शाळा सुरु राहणार

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

देशभरातील कामगार संघटनांनी पुकारलेल्या उद्याच्या (ता. 8) संपाला शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, त्याचा पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोणत्याही शाळेच्या कामकाजावर परिणाम होणार नाही. सर्व शाळा सुरू राहणार आहे, असे शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

पुण्याचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे यांनी शहरासह जिल्हयातील सर्व शाळा नियमितपणे सुरू राहतील, असे स्पष्ट केले आहे. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्‍चंद्र गायकवाड म्हणाले, “आमची संघटना बंदमध्ये सहभागी नाही. सर्व मुख्याध्यापक नियमितपणे शाळेवर हजर असतील. शाळाही सुरू राहतील.” महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाचे सचिव शिवाजी खांडेकर म्हणाले, “संपाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, आम्ही संपात सहभागी होणार नाही.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button