breaking-newsताज्या घडामोडी

उदयनराजे हे राजे आहेत; धीरज देशमुखांचं ‘रोखठोक’ उत्तर

अहमदनगर | महाईन्यूज

संगमनेरमध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी आयोजित केलेल्या मेधा-२०२० युवा संस्कृतीत महोत्सवात संवाद तरुणाईशी या कार्यक्रमात राज्यातल्या तरुण आमदारांसोबत सुसंवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात मंत्री आदित्य ठाकरे, रोहित पवार, आदिती तटकरे, ऋतुराज पाटील, धीरज देशमुख, झिशान सिद्दिकी सहभागी झाले होते. यामध्ये काँग्रेसचे नेते धीरज देशमुख यांना मुलाखतकार अवधूत गुप्ते यांनी कार्यक्रमाच्या रॅपिड फायर प्रश्नोत्तरात सर्वात जास्त प्रेम कोणावर आहे, अमित देशमुख की रितेश देशमुख असा प्रश्न विचारल्यावर धीरज देशमुख यांनी रितेश देशमुख यांच्यावर सर्वात जास्त प्रेम असल्याचे सांगितले.

धीरज देशमुख यांना रॅपिड फायर प्रश्नोत्तरात आगामी काळात मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल, रोहित पवार की आदित्य ठाकरे असा प्रश्न विचारल्यानंतर महाराष्ट्राने ठरवायचं आहे असे उत्तर दिले. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी साताऱ्याचे भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागितल्याने गेल्या काही दिवसांपासून वाद निर्माण झाला होता. संजय राऊत यांच्या या विधानाचा निषेध म्हणून गुरुवारी सातारा बंद ठेवण्यात आला होता. तसेच आज शिवप्रतिष्ठानने देखील सांगली बंदची हाक दिली होती. त्यामुळे संजय राऊत आणि उदयनराजे या दोघांपैकी नेमका धीर कोणी धरावा असा प्रश्न देखील अवधूत गुप्ते यांनी धीरज देशमुख यांना मुलाखतीत विचारला. यावर धीरज देशमुख यांनी उदयनराजे हे राजे असून ते श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे बाकीच्यांनी धीर धरावा असं म्हणत धीरज देशमुखांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button