breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

पुण्यातील सांगवीत उभारणार एसटीचे पहिले रुग्णालय

पुणे –  राज्यातील लाखो प्रवाशांची सेवा करण्याबरोबरच आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) गाडी आरोग्य सेवेतही सुसाट धावणार आहे. एसटीचे राज्यातील पहिले रुग्णालय पुण्यातील सांगवी येथे उभारण्यात येईल. शंभर खाटांच्या या रुग्णालयासोबतच वैद्यकीय महाविद्यालयही प्रस्तावित आहे. त्याबाबतची प्रक्रियाही नुकतीच सुरू करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाची पुणे ते अहमदनगर मार्गावर १९४८मध्ये पहिली बस धावली. या घटनेला यंदा ७० वर्षे पूर्ण होत आहेत. या ७० वर्षांमध्ये एसटी महामंडळाची सेवा कोट्यवधी प्रवाशांपर्यंत पोहोचली. दररोज हजारो बस राज्यभर प्रवाशांना सेवा देत आहेत. या काळात अनेक चढ-उतार पाहिलेल्या एसटीचे रूप मागील काही वर्षांपासून बदलत आहेत. प्रवाशांच्या सोयीनुसार अत्याधुनिक बस, अद्ययावत बस स्थानक, गाड्यांमध्ये वाय-फाय सुविधा, प्रवाशांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आता तर एसटीने ‘ट्रॅक’ बदलला असून प्रवासी सेवेबरोबरच आरोग्य सेवेतही उडी घेतली आहे.

‘एसटी’ने स्वत:च्या मालकीचे १०० खाटांचे अतिविशेष रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील एसटीचे हे पहिले रुग्णालय सांगवी येथील एसटीच्या जागेत होणार आहे. एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रुग्णालय व महाविद्यालयाची उभारणी केली जाणार आहे. सांगवी येथे महामंडळाची एकूण चार हेक्टर जागा आहे. या जागेतील काही भागात सध्या एसटी कॉलनी आहे. या जागेत पहिल्या टप्प्यामध्ये रुग्णालय बांधले जाणार आहे. त्यासाठी सुमारे पाच एकर जागा लागणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. सुमारे २० हजार ६३८ चौरस मीटर जागेत  रुग्णालयाची बांधणी केली जाणार आहे. पुढील दोन वर्षांत हे रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. सध्या एसटी कॉलनी याच जागेत राहील. कॉलनी हलविण्याबाबत नियोजन नाही. सुरुवातीला वाशी येथे रुग्णालयाबाबत चर्चा झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button