breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त पद्मनाभन यांचा राष्ट्रवादीतर्फे सत्कार

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिंचवडमधील अपहरण झालेल्या बारा वर्षाच्या मुलीची सुखरूप सुटका करण्याची कामगिरी दाखविल्याबद्दल पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पिंपरीचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांचा सत्कार करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमधील क्व‍िन टाऊन सोसायटीत राहणा-या माही अवध जैन (वय 12) हिचे गुरूवारी (दि. १५) दुपारी ४ वाजता शाळेतून घरी येताना अपहरण झाले. पोलिसांनी याबाबत तातडीने दखल घेतली व मुलीची बारा तासांच्या आत सुटका केल्याबद्दल शुक्रवार (दि. १६) पोलिस आयुक्त पद्मनाभन यांचा सत्कार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी  माजी उपमहापौर नगरसेवक राजू मिसाळ, खजिनदार संजय लंके, सरचिटणीस अमोल भोईटे, उपाध्यक्ष दिलीप गोते, बिपीन नाणेकर आदी उपस्थ‍ित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button