breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ई-पास रद्द होण्याची चिन्हं, राज्यातील अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जाहीर होणार

मुंबई | केंद्राने अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्रातील अनलॉकच्या चौथ्या टप्प्याची नियमावलीही आज जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्राच्या सूचनेनंतर राज्यात ई-पास रद्द करण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे.

प्रशासनाने ई-पास रद्द करण्याबाबत तयारी दाखवली आहे. अद्यापही खासगी वाहनांनी प्रवास करण्यासाठी ई-पास अनिवार्य आहे. त्यामुळे ई-पास रद्द करण्याची मागणी जनसामान्यांकडून केली जात आहे. याबाबत आज गाईडलाईन्स निघण्याची शक्यता आहे.

रेस्टॉरंट टप्प्याटप्प्याने सुरु करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु मेट्रो, रेल्वे, जिम, मंदिर आताच सुरु करण्याबाबत सरकारचा विचार नाही. दुसरीकडे, राज्य सरकारच्या कार्यालयात उपस्थिती वाढवण्याची शक्यता आहे. सध्या 15 टक्के असलेली उपस्थिती वाढवून 30 टक्क्यावर नेण्याचा विचार आहे. याबाबतही आज आदेश जारी होण्याची शक्यता आहे.

काय सुरु, काय बंद?

  • कंटेनमेंट झोनबाहेर लॉकडाऊन नाही…
  • कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन…
  • शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार…
  • ऑनलाइन शिक्षणासाठी शाळेत 50 टक्के शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बोलावता येणार…
  • 21 सप्टेंबरपासून फक्त 100 जणांच्या सहभागात सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना मंजुरी…
  • सप्टेंबरपासून मेट्रो रेल्वे टप्प्याटप्प्याने सुरु होणार…
  • मोकळ्या जागांवरील (ओपन एअर) थिएटर 21 सप्टेंबरपासून सुरु करता येणार…
  • सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर्स बंदच राहणार…
  • आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकही बंदच राहणार…
  • 21 सप्टेंबरनंतर लग्न समारंभास 50 ऐवजी 100 वऱ्हाड्यांची उपस्थित राहता येणार…
  • 21 सप्टेंबरनंतर अंत्यसंस्कारासाठी 20 ऐवजी 100 जणांना हजर राहता येणार…
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button