breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ईव्हीएममध्ये गडबड, छगन भुजबळांना दाट संशय

नाशिक –  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ईव्हीएमबाबत संशय व्यक्त केला आहे. नाशिक मतदारसंघात छगन भुजबळ यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांच्यासमवेत भुजबळ कुटुंबीयही उपस्थित होते. ईव्हीएम मशिन आणि निवडणूक कर्मचाऱ्यांमध्ये काहीतरी राजकीय डावपेच असल्याचे सांगत भुजबळ यांनी काहीतरी गडबड असल्याचा मला संशय वाटतो, असे म्हटले आहे.

निवडणूक यंत्रणेचे अधिकारी वर्षानुवर्षे हेच काम करतात. मग, त्यांना अनुभव नाही, किंवा माहिती नाही हे कसं शक्य आहे. या अधिकाऱ्यांवर वरुन काहीतरी दबाव आणलेला असू शकतो, असे म्हणत समीर भुजबळ यांच्या आईचं नाव मतदार यादीतून गायब झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. छगन भुजबळांसह समीर आणि पंकज भुजबळ या भुजबळ कुटुंबीयांनी सपत्नीक मतदान केलं आहे. मतदार केल्यानंतर भुजबळांनी मतदान अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. समीर भुजबळ यांच्या आईचं नाव मतदार यादीतून गायब झालं आहे. हे सगळं ठरवून केलं जातंय, असे भुजबळ म्हणाले. हिराबाई मगन भुजबळ हे समीर भुजबळ यांच्या आईचं नाव असून, मतदार यादीतून समीर भुजबळांच्या आईचे नाव गायब असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button