TOP Newsपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या सत्कार सोहळ्याचे तळेगावमध्ये व्हर्च्युअली प्रसारण : कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन
पिंपरी l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसाचा सत्कार सोहळा रविवारी (दि. 12) मुंबई येथे होणार आहे. त्या कार्यक्रमाचे मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालयात या व्हर्चुअल कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसाचा सत्कार सोहळा रविवारी (दि. 12) मुंबई येथे होणार आहे. त्या कार्यक्रमाचे व्हर्च्युअली प्रक्षेपण राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये स्क्रीन द्वारे दाखवण्यात येणार आहे. मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालयात या व्हर्चुअल कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मुख्य निमंत्रक व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी दिली.
रविवारी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत हा सोहळा होणार आहे. ह्या सोहळ्यानिमित्त माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी मंत्री मदन बाफना, तालुक्याचे आमदार सुनिल शेळके, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ, युवक, महिला व सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी तसेच सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक बबनराव भेगडे, सुभाषराव जाधव, दिपक हुलावळे, सचिन घोटकुले, सुवर्णा राऊत, सुनिल दाभाडे, नवनाथ चोपडे आदींनी केले आहे.