breaking-newsTOP NewsUncategorizedमहाराष्ट्रराजकारण

‘ईडी दाखवली तर सीडीही निघणार’, राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीकडून नोटीस मिळणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. खडसेंकडून अद्याप कोणतीही नोटीस मिळाले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पण यामुळे राज्यात पुन्हा एकदा ईडीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाजपला इशारा दिला असून, भाजपची ही हुकूमशाही सुरु आहे. ईडीची नोटीस ही सूडबुद्धीने देण्यात आली आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

ईडी दाखवली तर सीडीही निघणार आहे. भाजपचं हे दबावतंत्राचं राजकारण आहे. महाराष्ट्राच्या जनतेलादेखील माहिती पडलंय, कशाप्रकारे यंत्रणांचा चुकीचा फायदा घेऊन भाजपचे लोकं धिंगाणा घालत आहेत, असे मिटकरी यांनी म्हटले आहे.

पुण्यातील भोसरी जमीन व्यवहाराप्रकरणी एकनाथ खडसे यांनी ईडीची नोटीस मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button