breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पत्नी नांदायला येईना, पतीचे टॉवरवर चढून अनोखे आंदोलन, दीड तास चालला ड्रामा!

पुणे: नवरा-बायकोच्या संदर्भातील अनेक गोष्टी आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतात. आता बायकोसाठी नवऱ्याने टॉवरवर चढून आंदोलन केल्याची घटना समोर आली आहे. बायको सासरी म्हणजे नांदायला येत नाही म्हणून नवऱ्याने चक्क उंच टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केले. ही घटना जुन्नर तालुक्यातील गोद्रे गावात घडली आहे.

काय आहे प्रकरण?

गोद्रे येथे राहणाऱ्या तरुणीशी केशव काळे याचा २०२१ मध्ये विवाह झाला. मात्र, पती-पत्नीत सतत वाद व्हायचे. त्या कारणाहून पत्नी माहेरी निघून आली होती. आता पत्नीला नेण्यासाठी पती आपल्या सासरवाडीत म्हणजे गोद्रे येथे आला. पत्नीला घरी चल, अशा विनवण्या करू लागला. मात्र पत्नीने घरी येण्यास नकार दिला.

पत्नी येत नसल्याचे लक्षात येताच तो एका उंच टॉवरवर चढला. जोपर्यंत पत्नीला घरी नेणार नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा त्याने घेतला. त्याच्या या वेगळ्या युक्तीची चांगलीच करमणूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे प्रशासनाची देखील धावपळ उडाल्याचे पहायला मिळाले. जवळपास दीड तासाहून अधिक वेळ हा तरुण टॉवरवर चढला होता.

शेवटी पोलीस प्रशासनाने त्याच्या पत्नीला त्याच्या समोर आणले आणि दोघांमध्ये मनोमिलन घडवण्याचे आवाहन केले. त्यानंतर संबंधित तरुण टॉवरवरून खाली उतरला. हा टॉवर हाय होल्टेज वायरचा होता. तो खाली उतरल्यावर सर्वांना सुटकेचा निःश्वास सोडला. पोलीस पाटील सुमित लोहोटे यांनी पोलीस प्रशासनाला याची माहिती दिली होती. पती केशव काळे याने या आधीही डोंगरावर चढून उडी मारण्याची धमकी दिली होती. तसेच याबाबत अर्ज दिला असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र, पत्नीला आणायला गेलेल्या पतीच्या अनोख्या शक्कलने गावभर जोरदार चर्चा रंगली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button