breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ईडीनं पुन्हा उघडली ‘आदर्श’ची फाईल; शपथविधीआधी अशोक चव्हाणांना धक्का

मुंबई: भाजपाला दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. या तीन पक्षांनी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करत भाजपाला जोरदार दणका दिला. मात्र आता केंद्र सरकारनं राज्यात स्थापन होणाऱ्या सरकारला पहिला धक्का दिला आहे. अंमलबजावणी संचलनालयानं (ईडी) आदर्श सोसायटी घोटाळ्याची चौकशी पुन्हा एकदा सुरू केली आहे. आदर्श प्रकरणात नाव आल्यानं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं. आता अशोक चव्हाण महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याची दाट शक्यता असताना ईडीनं आदर्श प्रकरणाची फाईल उघडली आहे. 

शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्याचवेळी अशोक चव्हाणदेखील मंत्रिपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता आहे. मात्र त्याआधीच ईडीनं आदर्श सोसायटी प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू केली आहे. याच प्रकरणामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. या प्रकरणात चव्हाणांविरोधीत खटला चालवण्याची परवानगी राज्यपालांनी दिली होती. मात्र न्यायालयानं त्यांचा आदेश रद्दबातल ठरवला होता.  

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button