breaking-newsराष्ट्रिय

ईडीकडून झाकीर नाईकविरोधात आरोपपत्र दाखल; ५० कोटींची संपत्तीही जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रसारक झाकीर नाईक आणि अन्य आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केले. त्याचबरोबर ईडीने आर्थिक घोटाळ्यातील १९३.०६ कोटी रुपयांच्या संपत्तीची निश्चितीही केली आहे. नाईकची ५० कोटी रुपयांची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. ईडीने नाईक आणि इतरांविरोधात २२ डिसेंबर २०१६ रोजी आर्थिक घोटाळाप्रकरणी खटला दाखल केला होता.

याचवर्षी ईडीने २२ मार्च रोजी आर्थिक घोटाळा आणि फंड ट्रान्सफरप्रकरणी नाईकची मदत केल्याच्या आरोपात नजमुद्दीन साथकला अटक केली होती. १९ जानेवारीला ईडीने नाईकविरोधात आर्थिक घोटाळ्याप्रकरणी १६.४० कोटी रुपयांची संपत्ती गोठवली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button