breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लिपिकांच्या बदल्याचे स्थगित केलेले आदेश रद्द करा

आयुक्तांकडे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी 

पिंपरी – महापालिका आस्थापनेवर आयुक्तांच्या आदेशान्वये 9 लिपिकांच्या बदल्या महिन्यापुर्वी करण्यात आल्या. परंतू, त्यापैकी शिक्षण आणि करसंकलन विभागातील दोन लिपिकांच्या बदली आदेश स्थगित करण्यात आला. तो बदली स्थगित आदेश रद्द करुन संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्तांकडे केली. 

याबाबत महापालिका आयु्क्त श्रावण हर्डिकर यांना विरोधी पक्षनेत्यांनी पत्र दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की,  महापालिका आस्थापनेवरील ९ लिपिकांच्या बदल्या
महिन्यापूर्वी करण्यात आल्या होत्या. त्यापैकी शिक्षण विभाग, करसंकलन विभागातील दोन लिपिक बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. बदलीचा आदेश झुगारुन लिपिकांनी राजकीय दबाब टाकून बदली स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  यावरुन प्रशासन व आपल्या दुटप्पीपणा उघड झाला आहे. याच पध्दतीने मागे एका कार्यकारी अभियंत्याची बदली रद्द करण्यात आली होती. बदली रद्द करण्याकरीता राजकीय दबाब आणल्यास संबंधितांवर शिस्त भंगाची कारवाई करण्यात येईल अशी  स्पष्ट समज नमूद केलेली असते. तरी सुध्दा राजकीय दबावामुळे सदरच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे.

त्यामुळे ठराविक अधिकारी व कर्मचारी यांना वेगळा न्याय दिला जात आहे.  याविषयी आयुक्तांची दुप्पटीपणाची भूमिका स्पष्ट होत आहे. वस्तुत: प्रशासन प्रमूख म्हणून आपण सर्व कर्मचा-यांना समान न्याय देण्याची भूमिका घ्यावयास हवी होती. परंतु, आपण राजकीय दबावामुळे कर्मचा-यांच्या बदल्याबाबत दुजाभाव करुन कर्मचा-यांमध्ये असंतोष निर्माण करीत आहात. त्यामुळे सदरील बदल्या स्थगितीचे आदेश रद्द करुन पूर्वीप्रमाणे सदर कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात याव्यात, अन्यथा यापूर्वी बाकीच्या कर्मचा-यांच्या झालेल्या बदल्या रद्द करण्यात याव्यात. असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button