breaking-newsक्रिडाराष्ट्रिय

इम्रान खान दहशतवाद्यांचे आदर्श, गौतम गंभीर यांचा जोरदार प्रहार

क्रिकेटकडून राजकारणाच्या मैदानाकडे वळलेले भाजपाचे खासदार गौतम गंभीर यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर जोरदार शाब्दीक प्रहार केला आहे. संयुक्त राष्ट्रातील काश्मीरसंबंधीच्या भाषणावरुन इम्रान यांना गौतम गंभीरने खडे बोल सुनावले आहेत.

गौतम गंभीर यांनी टि्वटमधून इम्रान खान यांच्यावर टीका केली आहे. क्रीडापटू इतरांसाठी आदर्श असला पाहिजे पण पाकिस्तानचे पंतप्रधान दहशतवाद्यांचे आदर्श आहेत. चांगली वर्तणूक, संघ भावना, नैतिकता, चरित्र यामुळे क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती इतरांसाठी आदर्श असली पाहिजे. नुकतेच संयुक्त राष्ट्रामध्ये आपण माजी क्रीडापटूला भाषण करताना पाहिले. ते दहशतवाद्याचे आदर्श वाटले. इम्रान खान यांना क्रीडा क्षेत्रातून हद्दपार केले पाहिजे असे गौतम गंभीरने आपल्या टिे्वटमध्ये म्हटले आहे.

इम्रान खान पाकिस्तानचे कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने पहिल्यांदा १९९२ साली वर्ल्डकप जिंकला. क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. काश्मीरमधून निर्बंध हटवल्यानंतर तिथे मोठा हिंसाचार होईल असे वक्तव्य इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये बोलताना केला तसेच त्यांनी अण्वस्त्र वापरण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल असा सुद्धा इशारा दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button