breaking-newsआंतरराष्टीय

प्रेमासाठी ‘तिने’ सोडला भारत; दहशतवादी गटात सामिल झाल्याच्या बातम्यांचे केले खंडन

केरळमधील सियानी बेन्नी या १९ वर्षीय ख्रिश्चन मुलीने अबुधाबीला जाऊन मुस्लिम धर्म स्विकारल्याच्या प्रकरणाची सध्या देशात चर्चा सुरु आहे. हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. मात्र, या सर्व तथ्यहीन बातम्या असल्याचे सांगत आपण दहशतवादी गटांमध्ये सामिल होण्यासाठी नव्हे तर प्रेमाखातर भारत सोडून अबुधाबीला गेलो असल्याचे तीने म्हटले आहे. तिच्या पालकांनी पोलिसांत केलेल्या तक्ररीत संशय व्यक्त केल्याच्या पार्श्वभूमीवर तिने हे स्पष्टीकरण दिले आहे.

सियानीच्या पालकांनी आपली मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार दिल्ली पोलिसांमध्ये नोंदवली आहे. यात त्यांनी म्हटले की, “आपल्या मुलीचे अपहरण झाले आहे. तर तिच्या कॉलेजमधील एका वर्गमित्राने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करीत म्हटले की, जगभरात विनाश घडवणाऱ्या शक्तींनी एका भारतीय नागरिकाचे अपहरण केले आहे. या विविध वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर सियानीने आपले म्हणणे माडंले आहे.

रविवारी गल्फ न्यूजशी बोलताना सियानीने म्हटले की, “सध्या माध्यमांमध्ये माझ्याबाबत जी चर्चा आहे ती खरी नाही. मी माझ्या आतल्या आवाजाला अनुसरुन हा निर्णय घेतला. मी मुक्तपणे माझ्या मर्जीने अबुधाबीला आले. यासाठी माझ्यावर कोणीही दबाव टाकलेला नाही. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली मी भारताची एक वयस्क नागरिक असून स्वतंत्रपणे मी माझा निर्णय घेऊ शकते. अबुधाबीत गेल्यानंतर सियानीने मुस्लिम धर्म स्विकारत आपले नाव आयशा असे करुन घेतले आहे.

सियानी १८ सप्टेंबरपर्यंत कॉलेजमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत हजर होती. त्यानंतर दुपारी २.४५ वाजता तिने ‘गो एअर’च्या विमानात बसून अबूधाबीकडे प्रस्थान केले. सोशल मीडियावर ९ महिन्यांपूर्वी ओळख झालेल्या एका भारतीय मुलाच्या ती प्रेमात होती. तो सध्या अबूधाबीत राहत असून त्याच्याशी लग्न करण्यासाठी तीने हे पाऊल उचलले आहे.

सियानीचे पालक मूळचे केरळमधील कोझिकडे येथील आहेत. त्यांनी म्हटले की, “आमच्या मुलीला फसवून, तिचे ब्रेनवॉश आणि अपहरण करुन आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये सामिल करण्यासाठी किंवा तिथे गुलाम म्हणून कामासाठी नेले असण्याची आम्हाला भीती आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button