breaking-newsआंतरराष्टीय

इमरान खान यांच्या नवीन पाकिस्तानात अल्पसंख्याकांचे शोषण, हिंदू मुलीचे लग्न मंडपातून केले अपहरण

नवी दिल्ली | पाकिस्तानात हिंदूंचे शोषण होत असल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानातीस सिंध प्रांतात अपहरण, धर्म परिवर्तन आणि बळजबरीने हिंदू मुलींचे लग्न असे अनेक प्रकार घडत आहेत. अशाचप्रकारे आणखी एक प्रकार रविवारी घडला आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, कराचीपासून २१५ किलोमीटरवर असलेल्या सिंध प्रांतात मटियारी जिल्ह्यातील हाला शहरात एका विवाहादरम्यान मुलीला मंडपातून गायब केल्याचा प्रकार घडला आहे. या विवाहात स्थानिक पोलिसांचा बंदोबस्तदेखील होता. पोलिसांसमोर काही अज्ञात इसमांनी २४ वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण केले आहे असे बोलले जात आहे.

अपहरण करून पळवलेल्या मुलीला बळजबरीने इस्लाम स्विकारण्यास भाग पाडले आणि त्यानंतर तिचे एका मुस्लिम युवकाशी लग्न लावून दिले. या मुलीचे लग्न एका हिंदू मुलाशीच होणार होते. अज्ञात इसमांनी विवाहस्थळावरून या मुलीचे अपहरण केले. “माझ्या मुलीचा विवाह सोहळा सुरू होता. जेव्हा शाहरूख गुल नामक एक अपहरणकर्ता पोलिसांसह काही लोकांना घेऊन आला आणि भरदिवसा मुलीला उचलून घेऊन गेला”, असे पीडितेच्या वडिलांनी सांगितले.

अपहरणानंतर पीडितेला इस्लाम धर्मात घेण्यात आले आणि शाहरूख गुल याच्यासोबत लग्न लावून त्यांचे विवाहनोंदणी कागदपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. या कागदपत्रांनुसार, १ डिसेंबर २०१९ रोजी तिचे धर्मांतर झाले असे नमूद केले आहे. तिच्या विवाह प्रमाणपत्रावरून ज्याच्याशी पीडितेचे लग्न लावले तोही हाला शहरातीलच रहिवासी असल्याचे समजते. निसार अहमद यांचा मुलगा शहारूखही २४ वर्षांचा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button