breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंद्रायणी थडी यात्रेत साकारणार अयोध्येतील ‘राम मंदिर’ची भव्‍य प्रतिकृती

– भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचा ‘जय श्री राम’चा नारा
– शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडकरांची मान अभिमानाने उंचवावी, अशा ‘इंद्रायणी थडी’ जत्रेकडे आता देशभरातील रामभक्तांचे लक्ष लागले आहे. अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या ऐतिहासिक राम मंदिराची प्रतिकृती जत्रेत साकारण्यात येणार आहे. त्यामुळे तमाम रामभ क्तांसाठी ही यात्रा पर्वणी ठरणार आहे. विशेष म्हणजे, भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी  या जत्रेच्या माध्यमातून ‘जय श्री राम’ चा नारा दिला आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघांचे आमदार तथा पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीत महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘इंद्रायणी थडी’ जत्रा आयोजित केली जात आहे. येत्या ३० व ३१ जानेवारी आणि १ व २ फेब्रुवारी २०२० असे चार दिवस सकाळी १० ते सायंकाळी १० या वेळेत ही जत्रा कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील गावजत्रा मैदानावर होणार आहे.
महराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांने अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून आमदार लांडगे यांनी ओळख आहे. विधानसभा निवडणूक भाजपाचे फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली होती. पक्षाला सर्वाधिक १०५ जागा मिळाल्या आहेत. पण, भाजप-शिवसेना युती तुटल्यामुळे भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. त्यावेळी आमदार लांडगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना ‘रामभक्त हनुमान’ मूर्ती भेट देवून संघर्षच्या काळात मी तुमच्यासोबत आहे, असा विश्वास दिला होता.
विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसारच आमदार लांडगे यांना शहराध्यपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. संघटनात्मक बांधणीसाठी आमदार लांडगे यांनी ‘प्लॅनिंग’ केले आहे. कोणताही कार्यक्रम अत्यंत भव्य-दिव्य साजरा करुन त्या-त्या क्षेत्रातील ‘माईलस्टोन’ निर्माण करणारे आमदार लांडगे ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत राम मंदिर उभारून महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्ते आणि रामभक्तांच्या आकर्षनाचे केंद्रबिंदू ठरणार आहेत.
***
महेश लांडगे यांची संघटनात्मक बांधणी…
‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ अशी थीम घेवून यावर्षी ‘इंद्रायणी थडी’ जत्रा आयोजित केली जात आहे. तब्बल ८०० स्टॉल उभारले जाणार आहेत. तुफान गर्दी होणाऱ्या या जत्रेत अयोध्या येथे साकारणाऱ्या ‘राम मंदिर’ची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. आमदार लांडगे यांना पक्षाने नुकतील शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. हिंदुत्व आणि राम मंदिर हे भाजपचा अजेंडा आहे. मंदिराची प्रतिकृती उभारण्यासाठी सुरूवात करण्यात आली आहे.  ‘राम मंदिर’ची प्रतिकृती साकारात शहरवासीयांसमोर आमदार लांडगे यांनी ‘हिंदुत्त्वाचा मुद्दा’ ठेवला आहे. विशेष म्हणजे, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी ‘राम मंदिर’ हा अत्यंत जिव्‍हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे शहराध्यपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्याच कार्यक्रमात आमदार लांडगे यांनी ‘राम मंदिर’ची प्रतिकृती साकारात भाजप आणि हिंदुत्त्ववादी विचारधारा प्रखर करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
***
हिंदुत्ववादी संघटनांकडून उपक्रमाचे स्वागत…
महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण या हेतुने सुरू केलेल्या इंद्रायणी थडी जत्रेत यावर्षी जाज्वल्य हिंदुत्वाची साक्ष देणाऱ्या ‘राम मंदिर’ची प्रतिकृत उभारण्यात येणार आहे. सामाजिक उपक्रम म्हणून इंद्रायणी थडी महाराष्ट्रात लक्षवेधी होईल. पण, त्याहून ‘राम मंदिर’च्या प्रतिकृतीमुळे देशभरातील हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांच्या स्मरणात राहिल, अशा भावना शहरातील हिंदुत्त्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींकडून व्यक्त केल्या जात आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या उपक्रमाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आदी विविध संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button