breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘इंद्रायणी थडी’च्या माध्यमातून महिला बचतगटांना रोजगाराची सुवर्णसंधी

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

  • जत्रेसाठी तब्बल २ हजार अर्जांमधून ८०० स्टॉल्सची निश्चिती
  • आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून महत्त्वाकांक्षी उपक्रम

महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘इंद्रायणी थडी’ जत्रेची स्टॉल वाटप प्रक्रिया पूर्ण झाली असून, या जत्रेच्या माध्यमातून महिला बचतगटांसाठी रोजगार संधी उपलब्ध झाली आहे. स्टॉलची मागणी करण्यासाठी तब्बल २ हजार ७८ अर्ज दाखल झाले होते. त्या अर्जांची छाननी करून ८०० स्टॉल निश्चित करण्यात आले आहेत.


पिंपरी-चिंचवडचे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर महाराष्ट्रातील सर्वात मोठी जत्रा ‘इंद्रायणी थडी’ भरविण्यात येणार आहे. दि. ३०, ३१ जानेवारी आणि १, २ फेब्रवारी २०२० असे चार दिवस, सकाळी १० ते सायंकाळी १० या वेळेत ही जत्रा नागरिकांसाठी खुली राहणार आहे. ‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ ही जत्रेची थीम आहे. यासह मनोरंजन, खेळ, ऐतिहासिक पौराणिक देखावे, खाद्यपदार्थ, महिला बचतगाटांची उत्पादने, महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा याची प्रचिती देणारी इंद्रायणी थडी यावर्षी दुसरे पर्व साजरे करीत आहे.


जत्रेतील एकूण स्टॉल्सपैकी ८० टक्के स्टॉल महिला बचतगटांना देण्यात आले आहेत. त्यामध्ये बचतगटांनी निर्माण केलेली उत्पादने नागरिकांना पहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत. तसेच, मनोरंजनाचे कार्यक्रम, खेळ यासह जनजागृती करणाऱ्या संस्था-संघटनांचे स्टॉल आहेत. खाद्यपदार्थ, प्रदर्शन, आरोग्य आणि प्रथमोपचार, ज्वेलरी, कपडे, फूटवेअर, नाविन्यपूर्ण वस्तू, घरगुती सौदर्य प्रसाधने आदी विविध स्टॉल या जत्रेत पहायला मिळणार आहेत, अशी माहिती जत्रेचे समन्वयक संजय पटनी यांनी दिली.


शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पुजा महेश लांडगे म्हणाल्या की, गतवर्षी पेक्षा यावर्षी इंद्रायणी थडी जत्रेला महिला बचतगट आणि अन्य विविध संस्था-संघटनांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. तब्बल १२ एकर मैदानावर हा महोत्सव होणार आहे. जत्रेतील स्टॉलसाठी २ हजारांहून अधिक अर्ज दाखल झाले होते. पण, त्यापैकी केवळ ८०० स्टॉल्सला आम्हाला परवानगी देता आली. मात्र, ज्या इच्छुकांना स्टॉल मिळाले नाहीत. त्यांनी निराश होवू नये. पुढच्या वर्षी होणाऱ्या जत्रेत प्राधान्यांना संबंधितांना स्टॉल मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. स्टॉल मिळालेला नसला तरी सर्व संस्था-संघटनांनी जत्रेला आवर्जुन उपस्थित रहावे. तसेच, आम्हाला मार्गदर्शन आणि सूचना कराव्यात, असे आवाहनही पुजा लांडगे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button