breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या विषय समिती सभापती पदाची बिनविरोध निवड निश्चित

पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समिती सभापती पदाची निवड बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे. शहर सुधारणा समिती, विधी समिती, क्रीडा समिती आणि महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी एकूण चारच उमेदवारांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे चार उमेदवारांची निवड घोषीत करण्याची केवळ औपचारिकता पिठासिन अधिका-यांना पार पडणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समितीच्या सभापती पदाचा कार्यकाळ संपल्याने निवडणूक प्रक्रिया घेण्यात येत आहे. शहर सुधारणा, विधी, क्रीडा आणि महिला व बालकल्याण समितींच्या सभापती पदाचे अर्ज भरण्यासाठी आज सोमवारची (दि. 10)  मुदत देण्यात आली होती. मुदतीत चारच उमेदवारांचे अर्ज आले आहेत. शहर सुधारणा समितीसाठी राजेंद्र लांडगे, विधी समितीसाठी अश्विनी बोबडे, क्रीडा समितीसाठी तुषार हिंगे, महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी निर्मला कुटे यांचे अर्ज जमा झाले आहेत.

सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविली जाते. मात्र, चारच उमेदवारांनी अर्ज केल्याने ही निवड बिनविरोध होणार आहे. शुक्रवारी (दि. 14) सकाळी अकरा वाजता केवळ औपचारिकता म्हणून त्यांच्या नावांची घोषणा केली जाणार आहे. पिठासिन अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सबल अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सूचनेखाली सभापती पदाची निवड केली जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button