breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ताथवडे इंदिरा महाविद्यालयात विद्यार्थी परिषद उत्साहात

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  ताथवडे येथील इंदिरा महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय संगणकशास्त्र विभागाची विद्यार्थी परिषद उत्साहात पार पडली.  या परिषदेचे उद्घाटन न्युरोफुन्टेकचे सहसंस्थापक शरीफ मलिक (बार्सीलोना, स्पेन) यांच्या हस्ते केले. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जनार्दन पवार उपस्थित होते.

याप्रसंगी शरीफ मलिक यांनी कन्टेनरायझेशन या विषयावर मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात डॉ. जनार्दन पवार यांनी विद्यार्थी परिषदेचा उद्देश आणि महत्व स्पष्ट केले.
या परिषदेमध्ये विद्यार्थी संशोधकांनी 45 शोधनिबंध सादर केले. सर्व शोधनिबंध “अन्वेषन” या शोधपत्रिकेमध्ये प्रसिध्द करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शोधनिबंधाचे परिक्षण डॉ. रणजित पाटील(डॉ.डी.वाय.पाटील महाविद्यालय, पिंपरी) आणि डॉ. मनिषा पाटील(नाईस सिस्टिम्स, पुणे) यांनी केले.

परिषदेमध्ये सादर केलेल्या शोधनिबंधापैकी चार शोधनिबंधाना पारितोषिके देण्यात आली. प्रथम पारितोषिक आदित्य कुलकर्णी व राहुल पंजाबी यांना देण्यात आले. व्दितीय,
तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक अनुक्रमे सृष्टी जगताप व हर्षदा काटकर, अनिल प्रजापती, समीर खान, सलमान खान यांना प्रदान करण्यात आले. एकूण 80 संशोधक-विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

विद्यार्थी परिषदेचे पारितोषिक वितरण डॉ. जनार्दन पवार आणि श्री. शरीफ मलिक यांच्या उपस्थित पार पडाले. विद्यार्थी परिषदेचे आयोजन डॉ. जनार्दन पवार यांच्या
मार्गदर्शनात करण्यात आले. परिषद यशस्वी होण्यासाठी प्रा. मनिषा पाटील, प्रा. गुलाब नदाफ, प्रा. महेंद्र सुर्यवंशी, प्रा. निनाद थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button