breaking-newsराष्ट्रिय

पंतप्रधान मोदींच्या वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅक; हॅकर्सकडून बिटकॉईन्सची मागणी

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पर्सनल वेबसाइटचं ट्विटर अकाउंट गुरुवारी हॅकर्सनी हॅक केलं आहे. ट्विटरने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हॅकर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्सनल वेबसाइटचं ट्विटर हँडलवरून एका पाठोपाठ एक असे अनेक ट्वीट केले. तसेच क्रिप्टों करन्सी संबंधित अनेक ट्वीट केले आहेत. हॅकर्सनी कोविड-19 रिलीफ फंडसाठी डोनेशनमध्ये बिटकॉईनची मागणीही केली आहे. दरम्यान, हे ट्वीट काही वेळातच डिलीट करण्यात आले.

ट्विटर अकाउंटवर करण्यात आलेल्या एका ट्वीटमध्ये लिहिण्यात आलं होतं की, ‘मी तुम्हा लोकांकडे अपील करतो की, कोविड-19 साठी तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान मोदी रिलीफ फंडमध्ये डोनेट करा.’ ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्सना पंतप्रधान मोदींच्या या वेबसाइट अकाउंटबाबत माहिती होती आणि आता हे सुरक्षित करण्यासाठी पावलं उचलण्यात येत आहेत.

हॅक करण्यात आलेल्या व्हेरिफाइड अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेल्या बिटकॉइन स्वरुपात दान मागण्यात आलं. जगभरातील दिग्गज कंपन्यांमध्ये समावेश होणाऱ्या उबर आणि अॅपलचे ट्विटर अकाउंट्सही हॅकर्सनी हॅक केले होते. बिल गेट्स यांच्या अकाउंटवरून करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, ‘प्रत्येकजण मला समाजासा जान देण्यासाठी सांगत असतं, आता ती वेळ आली आहे. तुम्ही मला एक हजार डॉलर्स पाठवा, मी तुम्हाला त्या बदल्यात दोन हजार डॉलर्स परत करिन.’

बिटकॉइन स्कॅम हॅकिंगची घटना समोर आल्यानंतर शेकडो लोक हॅकर्सच्या जाळ्यात फसले होते. त्यांनी एक लाख डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम पाठवली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ट्विटरवर हॅक करण्यात आलेल्या पोस्ट समोर आल्यानंतर काही वेळातच ट्वीट डिलीट करण्यात आलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button