breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लाभार्थ्यांच्या याद्या उपलब्ध होण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांना पत्र

  • नागरिकांना लाभ न मिळाल्यास क्षेत्रीय अधिकारीच जबाबदार राहतील

पिंपरी / महाईन्यूज

कल्याणकारी योजनांतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी द्या, असे पत्र समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहे. लाभार्थ्यांना विहित वेळेत लाभ न मिळाल्यास त्याला क्षेत्रीय अधिकारी जबाबदार राहतील असेही पत्रात नमुद करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील जाहीर प्रकटनानुसार नागरी सुविधा केंद्रामार्फत 2020 – 21 या आर्थिक वर्षाकरिता विविध योजनांसाठी अर्ज स्वीकृती केलेली आहे. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालयाने पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या योजनानिहाय पात्र याद्या नागरवस्ती विभागाकडे देण्याची सुचना विभागाने केली आहे. पात्र, लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी 8 मार्च पुर्वी विना विलंब हार्ड कॉपीसह सादर करण्याची सुचना पत्रात दिली आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना मार्च अखेर लाभ देता येतील.

पात्र, लाभार्थ्यांची यादी वेळेत न मिळाल्यास व त्यांना लाभ देण्यात उशीर झाला तर त्याला क्षेत्रीय कार्यालय जबाबदार असेल असे पत्रात नमुद करण्यात आले आहे. अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह या क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांना हे पत्र देण्यात आल्याची माहिती ऐवले यांनी पत्राद्वारे दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button