breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

इंदापूर तालुक्यात विमान कोसळले, वैमानिक जखमी

पुणे – तांत्रीक विघाडामुळे इंदापूर तालुक्यातील रुई गावात विमान कोसळले आहे. या दुर्घटनेत प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला आहे. हे विमान तांत्रीक विघाडामुळे कोसळल्याचे सूत्रांनी सांगितले.

इंदापूर तालुक्यातील रूई येथील श्री बाबीर विद्यालयाजवळ मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास बारामतीतील कार्वर अॅव्हिएशनचे एक विमान कोसळले. विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ३५०० फुट उंचीवरून हे विमान खाली कोसळले. यात प्रशिक्षणार्थी वैमानिक जखमी झाला आहे. स्थानिकांच्या मदतीने त्याला खासगी दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन बारामती येथे हलवण्यात आले आहे. सिध्दार्थ टायटस असे जखमी झालेल्या प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे नाव आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button