breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आवास योजनेंतर्गत अंध, अपंगांसाठी प्रकल्प राबवा

  • आमदार बच्चू कडू यांची पालिकेला भेट
  • अंध, अपंगाच्या योजनांवर प्रशासनासोबत केली चर्चा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरातील अंध, अपंगांसाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत विकास प्रकल्प राबविण्यात यावेत. सहा वर्षाखालील अपंगांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी विशेष योजना राबवावी, अशी संकल्पना प्रहार संघटनेचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी पालिका प्रशासनाला सुचविली आहे.

शहरातील अंध, अपंगांसाठी वेगवेगळ्या योजना राबविण्याची मागणी करण्यासाठी आमदार कडू यांनी पालिकेला भेट दिली. अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण अष्टीकर यांच्यासोबत अपंगांसाठी राबविल्या जाणा-या योजना आणि भविष्यातील प्रस्तावित योजनांच्या संदर्भात चर्चा केली. त्याचबरोबर शहरातील अंध, अपंगांच्या संगोपणासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आणि महापालिकेच्या मालकीची जागा उपलब्ध करून देण्यात यावी. त्यामध्ये अपंगांसाठीच्या वेगवेगळ्या सुविधा निर्माण करून देता येतील. ज्यामुळे अपंगांचा सर्वांगिन विकास होईल, अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली.

आमदार कडू म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अंध, अपंगांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने डीपीआर तयार करावा. त्याचबरोबर केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत आरक्षण ठेवता येते का?, याची शहानिशा करावी. अपंगांचे आरक्षण तीन टक्क्यांवरून पाच टक्के झाले आहे. त्यामुळे त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.

तसेच, अपंगांचा आरोग्य विमा उतरविण्यात यावा. पिंपरीत अपंग भवन बांधण्याची संकल्पना त्यांनी जाणून घेतली. त्याचबरोबर अपंग कल्याणकारी योजनेचा निधी अन्य योजनांवर वर्ग होतोय का?, याची विचारणा त्यांनी केली. त्याचबरोबर पालिकेतर्फे राबविल्या जाणा-या योजनांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले, अशी माहिती अष्टीकर यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button