breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

आळंदीत मराठा मोर्चा, राणे पितापुत्रांचा निषेध

आळंदी (पुणे) –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील मराठा आंदोलनाबाबत वेगवेगळी वक्तव्य व्यक्त करून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. तर खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे हे मराठा आरक्षणासाठी प्रयत्नात असल्याचा आव आणत आहेत. प्रत्यक्षात दोघा पितापुत्रांची धडपड मराठा आरक्षणासाठी नसून त्यांच्या वैयक्तित मंत्रीपदाच्या लालसेसाठी आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील भडकावू विधाने करणाऱ्या मंत्र्यांसह राणे पितापुत्राचा आज आळंदीत मराठा मोर्च्याच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चासाठी शेकडो मराठा आंदोलकांनी हजेरी लावली. तर शहरातील दुकाने सकाळपासूनच बंद ठेवून शासनाच्या विरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला.

यावेळी मोर्चाची सुरूवात सकाळी साडेदहाच्या दरम्यान आळंदीतील चाकण चौकातून करण्यात आली. त्यानंतर प्रदक्षिणा रस्त्यावरून मोर्चा चावडी चौक, महाद्वार चौक आणि पालिका चौकात आणण्यात आला. यावेळी मरकळ चौक आणि पालिका चौकात मोर्चेकरांनी ठिय्या मारून रास्ता रोको केला.पालिका चौकातून नदीपलिकडे देहूफाटा येथे मोर्चे करांनी सरकारच्या विरोधात घोषणात देत मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली.

दरम्यान मोर्च्यासाठी शहरातील माजी नगरसेवक डी.डी.भोसले,नगरसेवक प्रकाश कु-हाडे,उत्तम गोगावले,संदिप नाईकरे,आनंद मुंगसे,योगेश दिघे,लखन घाटगे,संग्राम भंडारे,भागवत शेजवळ यांच्यासह सविता गावडे,मंगल हुंडारे,रूपाली पानसरे,पुष्पा कु-हाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button