breaking-newsमनोरंजन

आर्ची फेम रिंकूचा ‘कागर’चा ट्रेलर पाहिला का?

मुंबई : अभिनय क्षेत्राच्या पदार्पणातच मोठं यश मिळवणारी ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू आगामी ‘कागर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘राजकारणात डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडिसाखर ठेऊन चालायंच असतं’ असा रिंकूचा हा संवाद पाहता हा चित्रपट राजकारणाशी संबंधित असल्याचा अंदाज देतो. तसेच एकंदरित ट्रेलर पाहता हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित असल्याचे दिसते आहे.

https://youtu.be/APMbBtIbTaA

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त मकरंद माने यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कथा, पटकथाही लिहीली आहे. याआधी त्यांचे ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले होते. ‘कागर’च्या निमित्ताने मकरंद आणि रिंकू पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटात रिंकू एकदम वेगळ्याच लूकमध्ये दिसत आहे.

मकरंद यांच्या ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’ या दोन भिन्न विषयांच्या चित्रपटांनी प्रेक्षकांनी मनं जिंकली होती. त्यामुळे ‘कागर’विषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. रिंकूने नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यामध्ये तिने साकारलेल्या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button