breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘आरे’ मेट्रो कारशेडच्या नावाखाली सरकारचा जागा हडपण्याचा डाव – प्रकाश आंबेडकर

मुंबई | महाईन्यूज |

आरे परिसरात मेट्रो कारशेडच्या नावाने वृक्षतोड करुन जागा हडपण्याचा डाव भाजप-शिवसेनेचा आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचाही यामध्ये स्वार्थ आहे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. शिवसेना विरोध करत असल्याचं नाटकं करत आहे. येत्या निवडणुकीत जनताच त्यांना उत्तर देईल, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

आरे वृक्षतोडीच्या वादात आता वंचित बहुजन आघाडीनेही उडी घेतली आहे. पवई फिल्टरपाडा या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्त्वाखाली रविवारी दुपारी आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी स्वतःला अटक करवून घेतली. पोलिसांच्या बसमध्ये फ्रंट सीटवर बसून प्रकाश आंबेडकर आंदोलन स्थळावरुन रवाना झाले.

शुक्रवारी रात्री उशिरा आरे परिसरतील झाडं कापण्यात आली. ज्याचा पर्यावरण प्रेमींनी कडाडून निषेध नोंदवला. आरे परिसरात मेट्रोचे कारशेड उभारले जाणार आहे, त्यासाठी या ठिकाणी वृक्षतोड करण्यात आली. हे सगळे प्रकरण कोर्टात होते. कोर्टाने कारशेडला आडकाठी करता येणार नाही, असे सांगितल्यावर तो आदेश ज्या दिवशी आला त्यादिवशी रात्री या भागात वृक्षतोड करण्यात आली. ज्याचा पर्यावरण प्रेमींनी, काँग्रेसने, राष्ट्रवादीने आणि शिवसेनेनेही निषेध नोंदवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button