breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

सांगोल्याचे भाग्यविधाते माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

सोलापूर – सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते, विधिमंडळातील सर्वाधिक वेळा आमदार म्हणून निवडून आलेले, शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने सांगोला तालुक्यासह सर्वत्र शोककळा पसरली आहे.

गणपतराव देशमुख हे शेतकरी कामगार पक्ष या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील राजकारणी होते. ते सांगोला विधानसभा मतदारसंघातून १९६२ पासून अनेक दशके निवडून गेले. शेकापच्या नेत्यांसह राज्यातील सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केलीय. गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी आम्ही आणि मतदारसंघ आज पोरका झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघ हा सर्वात आगळावेगळा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. एक पक्ष, एक व्यक्ती, एक मतदारसंघ म्हणून सांगोला विधानसभा मतदारसंघाला ओळखले जाते. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार आबासाहेब ऊर्फ गणपतराव देशमुखांमुळे या मतदारसंघाची ही ओळख निर्माण झाली होती.. गणपतराव देशमुख या मतदारसंघातून तब्बल 11 वेळा विजयी झाले होते. ते विधानसभेत तब्बल 50 वर्षे राहिले आहेत. राज्यातील विधानसभेत सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. या काळात मुख्यमंत्रीपदाची संधीही त्यांना चालून आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button