breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्त श्रावण हर्डीकरांकडून शिष्टाचाराचा भंग, तातडीने कारवाई करा’

  • राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटेंची मुख्यमंत्राकडे मागणी

पिंपरी – मावळचे आमदार बाळा भेगडे यांची राज्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजप पक्षामार्फत सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सर्व संकेत व शिष्टाचार बाजूला करत भाजप कार्यालयात जाऊन बंद दाराआड भाजप पक्षाच्या कार्यालयात पक्षाच्या कार्यक्रमास आलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी ‘गुफ्तगू’ केले. त्यांनी शिष्टाचाराचा भंग केल्याने त्याच्यावर तातडीने कारवाई करा, अशी मागणी नगरसेवक मयुर कलाटे यांनी केली.

कलाटे यांनी दिलेल्या प्रसिध्दपत्रकांत म्हटले आहे की, महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्त राजकीय पक्षाच्या कार्यालयात गेले आहेत. यामुळे आयुक्त हर्डीकर हे भाजपचेच हस्तक असल्याचे सिध्द होते. महापालिका मुख्यालयात पालकमंत्र्यांनी येणे अपेक्षित असताना स्वत: आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजप कार्यालयात जाऊन पालकमंत्र्यांची ‘सरबराई’ केली. शिष्टाचाराप्रमाणे गैरपक्षीय ठिकाणी आयुक्तांनी पालकमंत्र्यांचे स्वागत करणे अपेक्षित असते. परंतु, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजप कार्यालयात जाऊन पालकमंत्र्यांशी बंद दाराआड ‘गुप्तचर्चा’ केली. भाजपच्या बैठकीला हजेरी लावणे त्यांनी पसंत केले. महापालिकेच्या आजपर्यंतच्या इतिहासात एकही आयुक्ताने सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयात जाऊन पालकमंत्र्यांचे स्वागत केले नाही. मात्र विद्यमान आयुक्त श्रावण हर्डीकर त्याला अपवाद ठरले आहेत. त्यामुळे या आधी त्यांच्यावर भाजपचे प्रवक्ते, दलाल, असे आरोप करण्यात आले होते, ते आजच्या घटनेवरुन सिध्द झाले आहे.

तीन वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी एका खाजगी हॉटेलमध्ये मनपाच्या अंदाजपत्रकाबाबत माहिती देण्यासाठी नगरसदस्यांची बैठक घेतली असता, त्यांच्या विरुध्द तत्कालीन विरोधी पक्षाने तक्रार करुन याच मुख्यमंत्र्यांनी त्यांची तातडीने बदली केली होती. त्याच न्यायाने आजच्या या घटनेबाबत मा. मुख्यमंत्री यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची बदली करावी. तसेच मा. मुख्यमंत्री नेहमीच क्लिन चिट देण्यात अग्रेसर असतात यावेळी त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर कडक कारवाई करुन दाखवावी, अशी मागणी याव्दारे करीत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button