breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तांच्या आदेशानंतर विद्युत विभागाला आली जाग, नागरिकांना केले आवाहन

पिंपरी, (महाईन्यूज) – आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी सर्व विभागांना आदेश देताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभागाने शहरातील नागरिकांना विद्युत पुरवठ्यासंदर्भात सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. पथदिव्यांच्या खांबाना स्पर्श करू नये, विना परवाना विद्युत पुरवठा घेऊ नये, जनावरे विद्युत खांबांना बांधू नये, कपडे सुकविण्यासाठी विद्युत पोलचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरूवारी (दि. 20) पार पडली. या सभेत कचरा, पाणी या विषयांवरून आयुक्तांना सर्वपक्षीय नगरसेवकांनी भर सभेत घेरले. प्रत्येक प्रभागातील अधिका-यांच्या दुर्लक्षपणाचा पाडा नगरसेवकांनी सभेत वाचला. त्यावर महापौर राहूल जाधव यांनी आयुक्तांना सर्व विभागांना आदेश देण्याची सूचना केली. त्यावर आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी पालिकेच्या सर्वच विभागांना कामात दिरंगाई अथवा हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकारी, कर्मचारी निलंबित कारवाईला सामोरे जाईल, असे आदेश दिले. त्यावर विद्युत विभागाचे सह शहर अभियंता प्रवीण तुपे यांनी सतर्कता बाळगून त्याच दिवशी नागरिकांना विद्युतविषयक सार्वजनिक यंत्रणेशी सलोख्याने वाग्याचे आवाहन केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवाबत्तीसाठी 3 फेज 440 व्होल्टचा वीजपुरवठा केला जातो. नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने दिवाबत्ती खांब व यंत्रणेची छेडछाड करू नये. खांबाला व फिडर पिलरला स्पर्श करू नये, विना परवाना वीज पुरवठा घेऊ नये, जनावरे विद्युत दिव्यांच्या खांबाला बांधू नये, जंक्शन बॉक्सवर पाय ठेवून खांबावर चढू नये, कपडे वाळविण्याकरिता तारा पोलला बांधू नये, बांधकामामध्ये पोल घेऊ नये, पोलला फ्लेक्स किंवा होर्डिंग्ज बांधू नये, तसेच, पोलच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्यावी. कुठल्याही प्रकारची केबल किंवा तार खांबावरून ओढू नये, अशा प्रकारच्या कृत्यामुळे संबधित नागरिकांचे जीवितास धोका उत्पन्न होण्याची किंवा जीवित हाणी होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या कृत्यामुळे कोणत्याही प्रकारची वित्त व जीवित हाणी झाल्यास पिंपरी-चिंचवड महापालिका जबाबदार असणार नाही. त्यामुळे विद्युत विषयक बाबींसाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन सह शहर अभियंते तुपे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button