breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

आयपीएल सामने तीन स्टेडियममध्ये प्रेक्षकांविना खेळवले जावेत – पीटरसन

मुंबई | यावर्षी छोट्या प्रकारात प्रेक्षकांविना आयपीएल स्पर्धा घेण्यात यावी, असे केविन पीटरसनने सुचवले आहे. त्याने म्हटले की, चाहत्यांचा जीव धोक्यात घालणे योग्य नाही. ही क्रिकेटच्या सत्राची सुरुवात आहे. मला वाटते, जगातील प्रत्येक खेळाडू आयपीएल खेळू इच्छितात. ही स्पर्धा केवळ खेळाडू व फ्रँचायझी यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असते असे नाही.

त्याच्या आयोजनामागे काम करत असलेल्या लोकांचे महत्त्वाचे योगदान असते. त्यावर हजारो लोकांचे घर अवलंबून आहे. पीटरसनने म्हटले, ‘सामने तीन सामन्यांतच खेळवावे. तेथे प्रेक्षक नसावे. खेळाडूंनी तीन-चार आठवड्यांत स्पर्धा खेळावी. ही छोटी स्पर्धा असावी.’ माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकरने देखील पीटरसनचे समर्थन केले. त्याने म्हटले की, सर्व परवानग्या मिळाल्यानंतर स्पर्धेचे आयोजन केले पाहिजे.

अँड्यू स्ट्रॉसने कबूल केले की, त्याने केविन पीटरसनचा मुद्दा चांगल्या प्रकारे हाताळला नाही. तरी तो संघाचे नियम मानत नव्हता. २०१४ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर पीटरसनने स्ट्रॉसला दोषी ठरवले होते. स्ट्रॉसने म्हटले, आयपीएल खेळाडूंसाठी आवश्यक आहे. मात्र कसोटीवर मान्यता दिली जाऊ शकत नाही. आयपीएलवर इंग्लंड क्रिकेट संघटनेच्या नियमानुसार स्ट्रॉस व पीटरसन यांच्यात खूप मतभेद होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button