breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयआयएमएसद्वारे एमबीए तुकडीचा प्रवेशारंभ सोहळा उत्‍साहात

पिंपरी – शैक्षणिक वर्ष २०१८ साठी एमबीए अभ्‍यासक्रमाकरिता नव्‍यानं प्रवेशित विद्यार्थ्‍यांचं स्‍वागत आणि समावेश करण्‍यासाठी यशस्‍वी एज्‍युकेशन सोसायटीच्‍या चिंचवड इथल्‍या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्‍समध्‍ये आज बुधवारी (दि. 1) ‘यशोप्रवेश’ या  स्वागत सोहळ्याचं म्हणजेच इंडक्शन कार्यक्रमाचं उद्घाटन झालं.

 

कार्यक्रमाच्या  पहिल्या सत्रात येस बँकेचे कार्यकारी समूह उपाध्यक्ष व प्रादेशिक  व्यापार प्रमुख नीरज माढेकर यांचे व्याख्यान झाले. आपल्या मनोगतात त्यांनी आत्मविश्वासाचे महत्व व संभाषण कौशल्य कला याविषयी मार्गदर्शन केले. तर, हिताची ऑटोमोटिव्ह सिस्टीम्स कंपनीच्या विक्री आणि ऑपरेशन विकास विभागाचे महाव्यवस्थापक जयदीप संत यांनी आपल्या मनोगतात प्रत्येकाला स्वतःमध्येच कशाप्रकारे गुणवृद्धी करता येऊ शकते, याबाबत  मार्गदर्शन केले. तसेच, चौकटीबाहेरचा विचार करण्याची क्षमता विकसित करण्यावर भर द्यायला हवा, असे  सांगितले.

 

कार्यक्रमाच्या व्दितीय सत्रात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सिनेट सदस्य डॉ. महेश आबाळे यांनी मार्गदर्शन करताना एमबीए अभ्यासक्रमाचे महत्व सविस्तररीत्या सांगून विद्यार्थ्यानी पहिल्या दिवसापासूनच स्वतःच्या व्यक्तिमत्वात कॉर्पोरेट क्षेत्रात जाण्याच्या दृष्टीने आवश्यक ते बदल आत्मसात करण्याकडे लक्ष द्यावे असे सांगितले. इंडक्शन सोहळ्याच्या पहिल्या दिवसाच्या समारोप सत्रात बोलताना  संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद मराठे यांनी प्रवेश सोहळ्याचे महत्व विषद केले. दरम्यान, या प्रवेश सोहळ्यात विद्यार्थ्यानी विविध मॅनेजमेंट खेळांमध्येही भाग घेतला.

 

यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस, अभिषेक यांच्यासह सर्व प्राध्यापक वर्ग, अन्य कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button