breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी” : राष्ट्रवादी

पुणे : ”आम्हाला हवी विकासाची गाडी, नकाे आम्हाला चंपा साडी” असे म्हणत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्यावतीने चंद्रकांत पाटील यांनी साड्या वाटल्याचा निषेध करण्यात आला. पुण्यातील खंडाेजीबाबा चाैक येथे राष्ट्रवादीकडून आंदाेलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील आणि भाजपाच्या निषेधार्थ घाेषणा देण्यात आल्या. 

चंद्रकांत पाटील यांनी काेथरुड विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांच्या माध्यमातून काेथरुड भागात घरकाम करणाऱ्या महिलांना दिवाळीच्या निमित्ताने साड्यांचे वाटप केले. या साडी वाटपाबाबत अनेकांनी आक्षेप घेतले. मनसेकडून देखील याचा निषेध करण्यात आला हाेता. आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पुण्यातील खंडाेजीबाब चाैकात निषेध आंदाेलन करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित आमदार आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित हाेते. कंपनीकडून रिजेक्टेड साड्या वाटल्याचा आराेपही यावेळी करण्यात आला. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button