breaking-newsमहाराष्ट्र

प्रेमप्रकरणातून युवकाची हत्या ; आरोपीला अटक

चंद्रपूर : येथील घुटकाळा प्रभागात प्रेम प्रकरणातून दिवाळीच्या पूर्वसंध्येला अक्षय मून या युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मृतअक्षय मून याचे प्रेमसंबंध होते. यातील आरोपी साजन ऊर्फ बोद्या हा अक्षयच्या प्रेयसीला ‘तू माझ्यासोबत बोल’ असे म्हणत त्रास देत होता. यावरून एके दिवशी ही बाब अक्षय याला माहीत झाली. त्यामुळे अक्षयने साजन याला विचारले की तू माझ्या प्रेयसीला का त्रास देतो, या कारणावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. याचे रूपांतर भांडणात झाले. आरोपीने मनात राग धरून अक्षय मून याचा खून केला.

त्यानंतर आरोपी व त्याचे मित्र घटनास्थळाहून पसार झाले. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि काही वेळातच यातील आरोपी साजन ऊर्फ बोद्या रंजीत डोंगरे (१९) याला अटक केली. त्यानंतर दुसरा आरोपी राजन ऊर्फ गुलशन डोंगरे (२१) यालाही अटक केली. या गुन्हय़ाचा अधिक तपास सुरू आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button